लोहा : प्रतिनिधी
लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन लोहा तालुका समन्वय पुनर्विलोकन समिती गठीत करण्यात आली असून या समितीत काँग्रेसचे नांदेड दक्षिण चे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समन्वय समितीचे सदस्य म्हणून आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या समर्थकांची वर्णी लागली आहे, आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली
नवीन गठीत समन्वय समितीत शेकापचे जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील शिंदे हरबळकर, लोहा बाजार समितीचे संचालक स्वप्निल पाटील उमरेकर,सिद्धू पा. वडजे,कापसी माजी सरपंच राजू पाटील वडवळे, हातनीचे माजी सरपंच सुनिल भदरगे,अश्विनी कापुरे, यांचा या नूतन समितीत समावेश आहे, सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे ,शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रांत दादा श्यामसुंदर शिंदे यांनी सर्व नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.