काल जाणवलेली रूक्षता

आपल्या लहानपणी आपण आपल्यापेक्षा मोठ्या मंडळीना भेटुन त्यांना आपट्याचं पान देउन त्याना नमस्कार करायचो.. एकमेकांकडे जाण्या येण्यात दिवस कुठे निघुन जायचा कळायचं नाही .. मंदिरात वाजत गाजत देवाला सोनं दिलं जायचं आणि मग गावात एकमेकांना सोनं म्हणजेच आपट्याची पानं वाटली जायची.. एकतर आपट्याची झाडं कमी झाली की काय अशी शंका येते कारण कंचन नावाचा वृक्ष त्याला राणी कलरची फुलं येतात त्याची पानं तोडताना काल मी काही जणाना पाहिलं.. कंचनची पानं थोडी मोठी आणि पातळ असतात आणि आपट्याची लहान आणि जाड असतात..

आकार बऱ्यापैकी सारखा असतो.. थोडा झाडांचाही अभ्यास करा..
आपट्याचीच पाने का ?? इतरही झाडे आहेतच कीशंकराला बेल.. गणपतीला दुर्वा वटपोर्णिमेला वडाची पुजा पिंपळाची का नाही तसच आपटा हा महावृक्ष असुन तो महादोषांचे निवारण करतो.. शत्रूंचा नाश करतो..त्याला अश्मंतक म्हणतात याचा अर्थ मुतखडा होवु न देणारा..

 

आपट्याच्या सालीपासून दोरखन्ड बनवला जातो
त्याच्या सालीपासून डिंक मिळतो..
त्याची पानं पित्त आणि कफावर गुणकारी आहेत
लघवीची जळजळ असेल.. गालगुंड असेल असे याचे अनेक उपयोग आहेत..
या झाडाबद्द्ल नवीन पिढीला माहीती व्हावी .. एकमेकांच्या घरी जाणे येणे वाढते ..

विचारांची देवाणघेवाण होते या सगळ्यासाठी खरं तर सण असतात पण काल मी कुठल्याही मुलाला कोणाच्याही घरी जाताना पाहिले नाही.. प्रत्येकजण फक्त आलेले मेसेजेस पुढे सरकवुन आपलं कर्तव्य पुरं करण्यात बिझी होते.. ना प्रेम.. ना आपुलकी . ना जिव्हाळा होती ती फक्त रुक्षता..

अजुन पाच दहा वर्षाने काय परिस्थिती येइल या कल्पनेनेच अंगावर काटा येतो. प्रत्येकाला एकटं रहायचय. कोणालाही कळप नकोय.. रांगोळीला जागा नाही म्हणुन ठिक आहे पण ज्यांच्याकडे जागा आहे त्यांनीही दोन बोटं दारात ओढायचे कष्ट घेतले नाहीत… खरं तर ती कला आहे .. त्याने फोन केला नाही तर मी का करु ?? .. त्याने मेसेज केला नाहीतर मी का करु ??.. अशातच आपण आपली पुढील पिढीही बरबाद करणार .. मोठ्या शहरात तर खूपच वाईट परिस्थिती आहे..

 

आणि आता खेडीही त्याच पावलावर पाऊल टाकत चालत आहेत हे तर अधोगतीकडे जाणारे आहे..

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *