माणसाने अहंकार सोडा आणि निस्वार्थपणे मनमोकळेपणाने जीवन जगा – आचार्य गुरुराज स्वामी महाराज यांचे प्रतिपादन

नयनरम्य आतिश बाजी, लेजर शो आणि रावण दहनाने* अहमदपूरकर झाले मंत्रमुग्ध

अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे ) 

राजा रावण हा जगविख्यात श्रीमंत ज्ञानी तपस्वी होता परमपिता महादेवाचा तो अध्यभक्त असून तो शिवा ची आराधना मनोभावे करायचा परंतु राजा रावण हा अहंकाराने वागायचा त्याच्या या गुणामुळे त्याची सोन्यासारखी लंका नष्ट झाली म्हणून सामान्य माणसाने जीवन जगताना अहंकार सोडला तर निस्वार्थपणे व मन मोकळेपणाने जीवन जगता येते असे आग्रही प्रतिपादन भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी यांनी केले .

ते दि.24 रोजी महात्मा गांधी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये सार्वजनिक दसरा महोत्सव समिती 2023 च्या वतीने समतेचा सोनं लुटण्यास अमृत्सम प्रवचन बनवयनरम्य आतिषबाजी लेजर शो रावण दहन सोहळ्यात आशीर्वचन प्रसंगी बोलत होते.

यावेळी दसरा व्यासपीठावर ह भ प गुरुवर्य आनंद महाराज बेलगावकर वीरमठ संस्थांचे मठाधिपती परमपूज्य राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची उपस्थिती होती.

गेले तीन दशकापेक्षा जास्तीची परंपरा असलेला अहमदपूरच्या सार्वजनिक दसरा महोत्सव अमृतसम प्रवचनाने ,नयनरम्य आदतिशबाजी, अनोख्या लेझरच्या शो ने अहमदपूरकर मंत्रमुग्ध झाले.

या समयी मोहसीन बायजीद यांचे मनोगत आणि परमपूज्य गुरवर्य अनंत महाराज बेलगावकर ,वीरमठ संस्थानचे मठाधिपती परमपूज्य राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वाचन पर भाषणे झाली.

*प्रारंभीर तहसीलदार शिवाजी पालेपाड यांच्या हस्ते शमीचे विधिवत पूजन करून लेझर शोला आरंभ करण्यात आला*.
नयनर मे आशिष बाजी ने अहमदपूरकरांच्या डोळ्याचे पारणे फेडून टाकले.
या समयी *माजी मंत्री बाळासाहेब जाधव, आमदार बाबासाहेब पाटील, माजी मंत्री विनायकराव पाटील ,माजी आमदार बबन खंदाडे ,माजी आमदार रामभाऊ गुंडीले, शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सांब महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे, एडवोकेट टि एन कांबळे, एडवोकेट राजाराम वाघमारे, मार्गदर्शक डॉ.अशोक सांगवीकर, ओम भाऊ पुणे, पापा आय्या, माधवराव पुणे, काँग्रेसचे अध्यक्ष डॉ गणेश कदम,माजी नगरसेवक अभय मिरकले, लक्ष्मीकांत कासनाळे, डॉ.सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, प्रा. विश्वंभर स्वामी, विकास महाजन, राहुल शिवपुजे,अड. निखिल कासनाळे, डॉ. अतुल खडके, चंद्रशेखर भालेराव, जुगल शर्मा, बालाजी मानकरी पाटील डॉ. गंगाधर साखरे* यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

 

*रावण दहन नगरपरिषदेचे प्रशासक तथा उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे* यांच्या हस्ते करण्यात आला.

*कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष सुभाष गुंडिले यांनी सूत्रसंचालन मार्गदर्शक राम तत्तापुरे यांनी तर आभार मार्गदर्शक गोविंद गिरी यांनी मांनले*.
पालख्यानी लक्ष वेधून घेतले.
शहरातील मानाची असलेली देवी राज राजेश्वरी देवीची पालखी, परमपूज्य राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची पालखी, मलसिद्ध स्वामी यांची पालखी आणि सोमनाथ स्वामी यांच्या मेण्याची शोभा यात्रा शहराच्या प्रमुख मार्गावरून महात्मा गांधी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये वाजत गाजत भजनी मंडळाने टाळकरी यांच्या निनादात दसरा मैदानावर पोहोचली .
यावेळी पोलीस बंदोबस्त चोख राखण्यासाठी *उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर, पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्यासह पोलीस पथकाने विशेष परिश्रम घेऊन* पोलीस बंदोबस्त चोख ठेवला.

दसरा महोत्सवामध्ये लेजर शो प्रथमच झाल्याने या लेजर शो चा दसरा महोत्सवाच्या मैदानावर जमलेल्या तरुणाई सह शासकीय अधिकारी व दसरा महोत्सवाच्या पदाधिकाऱ्यांनी ही नाचून आनंद घेतला.
दसरा महोत्सव यशस्वी करण्यासाठी साईनाथ पाटील, उपाध्यक्ष संगम पाटील, शिवा कासले, योगेश शेटकर, सहसचिव राजकुमार पुणे, कोषाध्यक्ष अनिकेत काशीकर ,सजावट प्रमुख नितीन धर्माधिकारी ,,तुकाराम लोकरे, गजानन सूर्यवंशी सौरभ कुलकर्णी, जयराज तेलंग, संतोष निटुरे, यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *