शेर-ए-हिंद शहिद टिपू सुलतान संघटनेच्या कंधार तालुकाध्यक्षपदी शेख सलीम शुलतान साब यांची निवड

कंधार ; प्रतिनिधी

शेर-ए-हिंद शहिद टिपू सुलतान  संघटनेच्या कंधार तालुका अध्यक्षपदी कंधार येथिल सामाजिक कार्यकर्ते शेख सलीम शुलतान साब यांची निवड दि.२८ ऑक्टोबर रोजी सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली .

शेख सलीम शुलतान साब यांनी मागील काळात विविध पक्ष संघटनेची जबाबदारी तसेच कार्यकर्ता म्हणून केलेल्या सामाजिक व राजकीय कार्याचा व्यापक अनुभवाचा उपयोग करुन संघटना वाढीसाठी सदर निवड असून  या निवडीमुळे संघटनेचे बळ वाढून संघटन मजबूत करण्यासाठी सदर निवड झाली असल्याची माहिती  शेर-ए-हिंद शहिद टिपू सुलतान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेख बशीर यांनी दिली त्याच्या व संस्थापक सचिव शेख मुस्तफा यांच्या हस्ते निवड पत्र देण्यात आले .यावेळी शेख़ जावेद, शेख़ अहेमद,शेख असिफ, शेख ज़फ़र, शेख फेरोज लाला यांची उपस्थिती होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *