नांदेड : मराठा समाजाचा लढा हा मागील कित्येक वर्षापासून चालू आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आदरणीय जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्र जागवला आहे आणि आज प्रत्येक तरुणाच्या व मराठ्यांच्या मनामध्ये लवकरात लवकर आरक्षण मिळावं यासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे क्रम प्राप्त असलं तरी मराठा तरुणांमध्ये याबाबतीत खूप निराशा आलेली आहे आणि दुर्दैवी बाब अशी की ह्या निराशातून बरेच मराठा तरुण आज आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत
अशाच काही घटना नांदेड जिल्ह्यात सुद्धा घडलेल्या आहेत हिंगोली लोकसभेतील हदगाव विधानसभेतील कामारी येथील सुदर्शन देवराये व शुभम पवार वडगाव ता हदगांव येथील तरुणांनी आत्महत्या केली व तसेच नायगाव तालुक्यातील रा. भोपाळा येथील ओंकार बावणे ह्या तिन्ही तरुणांनी नैराश्यातून आत्महत्या केली. या तिन्ही शहिदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपये मंजूर झाले आहेत अशी माहिती हिंगोली लोकसभा संयोजक डॉ. श्रीकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवाय देवराये कुटुंबाला डॉ. श्रीकांत पाटील यांनी त्यांच्या मुलीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून तिला डॉक्टर करण्याचे स्प्न पूर्ण करून देणार अशी वचन दिले तसेच त्यांच्या पत्नीला आजीवन 10 हजार रुपये प्रत्येक महिन्याला ओवाळणीच्या स्वरूपात देण्याचे ही सुरू केले आहे. या तिन्ही कुटुंबाची परिस्थिती खूप हालाखीची आहे. या नवविवाहित तरुणांनी आत्महत्या केल्यामुळे घरात चिमुकली मुलं, वृद्ध आई वडील व पत्नी खूप निराधार झाले आहेत अशा कुटुंबाला तात्काळ मदत करण्यासाठी डॉक्टर श्रीकांत पाटील व डॉक्टर रिता पाटील यांनी 26 ऑक्टोबर 2023 रोजी 3.30 वा नांदेड कलेक्टर अभिजित राऊत यांच्याबरोबर बैठक घेऊन व त्यांना लवकरात लवकर ह्या कुटुंबाना मदत करण्याचे तात्काळ आदेश दिले.
श्रीकांत पाटील यांनी मुख्यमंत्री कार्यालय व देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून या कुटुंबाला तात्काळ मदत करण्याची विनंती केली होती व अवघ्या 24 तासाच्या आत सरकारकडूनं 30 लाख रुपये हे वजीराबाद नांदेड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत जमा झाले असे पत्र माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांना प्राप्त झालेले आहे.
प्रत्येकी 10 लाख असे तीनही शहीद कुटुंबातील तरुणांच्या कायदेशीर वारसासदाराच्या अकाउंट मध्ये लवकरात लवकर जमा होतील.
डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितले की मराठा तरुणांसाठी रोजगार निर्माण व नव उद्योजक तयार करण्याचा त्यांचा मानस आहे
तरुणांनी नैराश्याच्या छायेत न जाता नवीन कौशल्य व रोजगार निर्माणाची वाट धरावी व त्यासाठी मी सर्व तरी प्रयत्न करीन असे डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी सर्व समाजातील तरुणांना आव्हाहन केले आहे.
याप्रसंगी डॉ. पाटील यांनी आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी व आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांचे आभार मानले.