कंधार ; प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तालुक्यातील अनेक गावात कुठे साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. तर कुठे पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. आता मराठा आरक्षणासाठी नविनच उपक्रम हाती घेतला आहे तो म्हणजे नेत्यांनी गाव पातळीपर दिलेल्या निधीतून सभागृह आहेत त्यावर टाकले ले नाव चक्क मिटवून टाकण्यात येत आहे . पहीले आरक्षण द्यावे नंतर नावे टाकावे असे आवाहन स्थानिक नेत्यांना चिंचोली तालुका कंधार येथील मराठा तरुणांनी केले आहे
आज दि28 रोजी कंधार तालुक्यातील चिंचोली येथे मराठ तरुणांनी नांदेड भाजपा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी त्यांच्या निधीतून दिलेले सभागृह आहे त्यावर त्यांचे नाव कोरले आहे .
हे कोरलेले नावच काढून टाकण्याची मोहीम येथिल मराठ तरुणांनी हाती घेतली आहे .
आता अनोखा फंडा समोर आला असून नेत्यांना गावबंदी नंतर आता सभागृह अथवा आमदार खासदार यांच्या दिलेल्या निधीतून बांधण्यात आली आहेत त्यावर त्याले नाव टाकले आहे ते आता काढले जात आहे .
पहीले मराठ्यांना आरक्षण द्यावे व नंतरच आमदार खासदारांनी आपले नावे टाकावे असे आवाहन केल्या जात आहे .