ज्येष्ठ नेते बापुराव पाटील तेलंग यांचे वृद्धापकाळाने निधन

 

( गऊळ ;
शंकर तेलंग )

 

 कंधार तालुक्यातील आंबुलगा गावचे भुमिपुत्र येथील नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते , कलंबर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक , माजी सरपंच , तथा माणिक प्रभू संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष , पितृतुल्य कर्मवीर बापुराव श्यामराव पा .तेलंग यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले , माजी जि . प. सदस्य श्री. मनोहर पा. तेलंग, डॉ. श्याम पा. तेलंग, श्री. मधुकर पा. तेलंग आणि श्री. सुधाकर पा. तेलंग (IAS )यांचे ते वडील होते . त्यांच्या पश्चातचार मुले, दोन मुली, नातू, पंतू असा मोठा परिवार आहे.

 

आंबुलगा परिसरातील गरीब व होतकरू मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे , उत्तम कुटुंबप्रमुख ,सरंपच , न्यायपंच , गाव – शेती – माती – गुराढोरांना , गावातील व परिसरातील लोकांना निस्वार्थी जीव लावणारं व्यक्तिमत्व म्हणून अशी त्यांची ख्याती होती .

आपले सेवावृत्ती तपोमय तेजोमय आयुष्य आम्हा सर्वांना प्रेरणादायी राहिले आहे … आपले निस्वार्थी समर्पित कार्य आम्हाला नक्कीच कायम स्मरणात राहील .
दि. ३० ऑक्टोंबर २०२३ रोज सोमवार सकाळी ९ : ३० वाजता त्यांचा अंत्यविधी मौजे आंबुलगा ता. कंधार, जि. नांदेड येथे होणार आहे.

 

आपल्या पवित्र आत्म्यास आंबुलगा व परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *