बापूराव पा. तेलंग यांच दुःखद निधन..

 

फुलवळ  (धोंडीबा बोरगावे )

नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते , कलंबर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक , माजी सरपंच , तथा माणिक प्रभू संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष , कंधार तालुक्यातील मौजे आंबूलगा येथील कर्मवीर बापुराव श्यामराव पा .तेलंग यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

ते माजी जि . प. सदस्य श्री. मनोहर पा. तेलंग, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष,जेष्ठ नेत्रतज्ञ
डॉ. श्याम पा. तेलंग, श्री. मधुकर पा. तेलंग आणि श्री. सुधाकर पा. तेलंग (IAS )यांचे ते वडील होते .

त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, नातू, पंतू असा मोठा परिवार आहे.

आंबुलगा परिसरातील गरीब व होतकरू मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे , उत्तम कुटुंबप्रमुख ,सरंपच , न्यायपंच , गाव – शेती – माती – गुराढोरांना , गावातील व परिसरातील लोकांना निस्वार्थी जीव लावणारं व्यक्तिमत्व म्हणून अशी त्यांची तालुक्यात ख्याती होती .

आपले सेवावृत्ती तपोमय तेजोमय आयुष्य आम्हा सर्वांना प्रेरणादायी राहिले आहे … आपले निस्वार्थी समर्पित कार्य आम्हाला नक्कीच कायम स्मरणात राहील .
ता.३० ऑक्टोंबर २०२३ रोज सोमवारी सकाळी ९ : ३० वाजता त्यांच्यावर मौजे आंबुलगा ता. कंधार, जि. नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *