लोहा; प्रतिनिधी:
नुकत्याच झालेल्या लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस,शिवसेना,शिवा संघटना,मन्याड फाउंडेशन,बी.आर. एस.युतीच्या शेतकरी विकास पॅनलने लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व मिळवत शेतकरी विकास पॅनलचे 18 पैकी 16 उमेदवार बहुमताने विजय झाले होते.काल रविवारी लोहा कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयामध्ये छोटेखानी कार्यक्रमात सभापती,उपसभापती यांची निवड करण्यात आली यावेळी सर्वांनूमते सभापती पदी शेतकरी कामगार पक्षाचे मराठवाडा सहचिटणीस युवा नेते विक्रांत दादा श्यामसुंदर शिंदे यांची लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली तर उपसभापती पदी अण्णासाहेब पाटील पवार यांची निवड करण्यात आली आहे, यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी चौधरी सह निवडणूक अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
चौकट;
*शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध ;*
*-विक्रांतदादा शिंदे:*
लोहा तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या सर्व अडीअडचणी दूर करण्यासाठी व शेतकरी बांधव, हमाल मापारी व व्यापारी यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असून महाराष्ट्रात लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीला मी सभापती या नात्याने मॉडेल करण्याचा प्रयत्न करणार असून लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी सर्व सोयी सुविधा व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे लोहा बाजार समितीचे नवनियुक्त सभापती विक्रांत दादा शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्रभर मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलने होत असून मराठा समाजाच्या मराठा आरक्षणाला माझा व आ. शिंदे कुटुंबीयांचा पूर्णपणे पाठिंबा असून आम्ही मनोज पा. जरांगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून माझ्या सभापती निवडीचा कोणत्याही कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा करू नये व हारतुरे,बॅनरबाजी करू नये असे आवाहन यावेळी नूतन सभापती विक्रांत दादा शिंदे यांनी सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना केले आहे . यावेळी लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे, तालुका काँग्रेस कमिटी कंधार अध्यक्ष बालाजीराव पांडागळे, लोहा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शरद पवार,खरेदी विक्री संघाचे उपसभापती शाम अण्णा पवार,माजी उपनराध्यक्ष सोनू संगेवार शेकाप जिल्हाध्यक्ष अवधूत शिंदे,शेकाप जिल्हाध्यक्ष बालाजी ईसातकर सह शेकाप, काँग्रेस,शिवसेना, शिवा संघटना, मन्याड फाउंडेशन,बी.आर.एस. सर्व पक्षातील पदाधिकारी,कार्यकर्ते व लोहा बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक चंद्रसेन पाटील,स्वप्निल उमरेकर,भास्कर ढगे, दत्ता दिघे,साहेबराव काळे,धोंडीबा पवार, पुनम शिरसागर, संयंत्राबाई सर्जे, बसवेश्वर धोंडे,केशव तिडके,लक्ष्मीबाई वाकडे,केरबा केंद्रे, मधुकर डाखोरे, भाऊराव कंधारे यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.