अधेमधे माझ्या लिखाणावर किवा रिल्सवर आलेले मेसेजेस चेक करताना तिथेच नवीन विषय सापडतात कारण ते मी सकारात्मकतेने घेतलेले असतात.. आज वाचनात आलेला
एक सुंदर मेसेज डेट या माझ्या लेखावर होता.. मॅम मला तुमच्यासोबत डेट करायची आहे कारण तुमचे शब्द नक्की कुठुन येतात हे मला जाणुन घ्यायचय .. How Romantic असं मी त्याला लिहीलं आणि अशीच माझी एक फॅंटसी मला आठवली.. मला डेट कोणासोबत करायला आवडेल तर एखाद्या आर्टीस्ट सोबत.. कारण एखादं पोर्ट्रेट काढताना किवा पेंटींग करताना तो नक्की काय विचार करत असेल किवा त्याच्या कल्पनेत त्याला नक्की काय दिसत असेल हे मला त्याच्या हृदयात बसुन जाणुन घ्यायला आवडेल .. त्याने केलेल्या पेंटींगवर मला माझ्या शब्दांसह प्रेम करायला आवडेल..
त्याने मला स्पर्श करु नये आणि त्याला मी स्पर्श करणार नाही.. जे बोलायचे ते फक्त कलेतुन..
ज्याने मला मेसेज केलाय तो मुलगा खरच शब्द शोधु शकेल का ??.. आणि माझ्या स्वप्नातील आर्टीस्टला मी खरच न्याय देउ शकेन का ??.. त्याच्या आतमधे उतरण्याची ताकद खरच माझ्यात आहे का ??.. कारण जेव्हा मी भावना मांडते तेव्हा शब्द समोरून चालत माझ्याकडे येताना दिसतात आणि माझ्याभोवती फेर धरतात कारण त्या सगळ्याना एकत्र यायचं असतं आणि मला त्यातील काही घेउन पुढे जायचं असतं..
एखादं पेंटींग काढणं आणि एखादी कलाकृती शब्दानी बांधणं दोन्ही जवळपास सिमीलर आहे.. एकीकडे रंग समोर येतात आणि ब्रश त्यातले रंग उचलतो आणि एकीकडे शब्द समोर येतात आणि पेन त्यातले ठरावीक उचलतो.. योग्य वेळी योग्य शब्द उचलुन भावना मांडणं ही साहित्यिकाची कला आणि योग्य वेळी योग्य रंग भरणं ही कलाकाराची कला..
किती छान ना.. अशा वेगवेगळ्या डेट्स आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग भरल्याशिवाय रहाणार नाहीत..
प्रत्येकाला डेटवर जायचं असतं पण एखाद्यालाच काहीतरी वेगळ्या डेटवर जाण्याचं भाग्य लाभतं.. विचारात नावीन्य असेल तर कृतीतही ते उतरतं आणि आयुष्य रोज नव्याने उमगतं अगदी माझ्या लेखणीसारखं.. माझ्या वाचकाची ही इच्छा तो कपेबल असेल तर जरुर पुरी केली जाईल आणि माझी फॅंटसी ??.. तीही पूर्ण होणारच की.. कारण मी सकारात्मकतेने प्रत्येक क्षणाकडे पहाते..
रोज नवनवीन कल्पनानी आयुष्य फुलवावं आणि लेखणीने सजवुन वाचकांच्या हातात द्यावं..
किती छान ना…. अगदी माझ्या गोड वाचकांसारखं..
सोनल गोडबोले