दि:-३० ऑक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेल्या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नियमित रिकत पदावर समायोजन करावे या मागणीसाठी शहरी व ग्रामीण भागातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कामबंद आंदोलनास सुरूवात केले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कंत्राटी नर्सेस औषध निर्माण अधिकारी ,वैद्यकीय अधिकारी समुपदेशक
(आर के एस के),समुपदेशक (एन सि डी) नर्सेस,शहरी एएनएम यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर सामावून घ्यावे तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिलेले आश्वासन पूर्ण करावे या मागणीसाठी कर्मचारी आंदोलन करत आहेत.
गेल्या १५ वर्षांपासून कमी मानधनावर अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत.कोरोना काळात जीवाची पर्वा न करता कर्मचाऱ्यांनी काम केले.मार्च २०२३ मध्ये झालेल्या बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी नर्सेस,औषध निर्माण अधिकारी ,एएनएम ,जीएनएम, वैद्यकीय अधिकारी,समुपदेशक (आर के एस के),
समुपदेशक (एन सि डी) नर्सेस,शहरी एएनएम यांनी संपात सहभागी झाले आहेत .या लोकाचे समायोजन करून वेतनवाढी बाबत आश्वासन देण्यात आले होते. पाच महिने होऊन देखील समायोजनाची कार्यवाही तसेच प्रलंबित प्रलंबित प्रश्नाबाबत कार्यवाही न झाल्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांमुळे असंतोष पसरला आहे.कंत्राटी कर्मचारी यांचा एकच नारा कायम करा या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला आहे.