एकच मिशन – मराठा आरक्षण” ची धग पोहचली गावागावात. फुलवळ मध्ये मराठा समाज अल्पसंख्याक असूनही ग्रामस्थांच्या सहकार्याने आरक्षणासाठी रास्तारोको यशस्वी..

फुलवळ  (धोंडीबा बोरगावे )

गेली अनेक वर्षांपासून “एकच मिशन,मराठा आरक्षण” चा नारा देत आजपर्यंत अनेक वेळा धरणे, उपोषणे, आंदोलने, आणि मुकमोर्चे काढत आपल्या मागणीप्रति आपला अखंडित पाठपुरावा चालूच ठेवत,अनेकांनी देह त्याग केला.पण अद्यापही सरकार काही केल्या ठाम निर्णय घ्यायला तयार नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली या गावात “मनोज पाटील जरांगे” यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली असून, त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून ता.३१ ऑक्टोबर रोज मंगळवारी सकाळी ११ वाजता फुलवळ ता. कंधार रास्तारोको करून बंद ची हाक देण्यात आली होती. त्यात येथील सकल मराठा समाजासह अठरा पगड जातीतील समाज बांधव व मराठा आंदोलनाला स्वयंस्फूर्तीने पाठींबा देणारे समस्त गावकरी यात सामील होऊन हे आंदोलन यशस्वी केले.

मराठा आरक्षणाची धग आता ग्रामीण भागातील गावागावात पोहचली असून अनेक गावात उपोषणाचे सत्र चालू आहे तर बहुतांश ठिकाणी रास्तारोको , आंदोलन करणे चालूच आहे , “एकच मिशन, मराठा आरक्षण” चा नारा आता मनामनात पेटला असूनही सरकार मात्र गांभीर्याने घेत नसल्याने व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी कंधार तालुक्यातील फुलवळ येथील सकल मराठा समाज व समस्त ग्रामस्थांच्या वतीने ता. ३१ ऑक्टोबर २०२३ रोज मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर असलेल्या फुलवळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्तारोको करणार असल्याचे रीतसर लेखी निवेदन आंदोलन कर्त्यांच्या वतीने तहसील कार्यालय कंधार व पोलीस ठाणे कंधार यांना देऊन फुलवळ येथे ता.३१ ऑक्टोबर २०२३ रोज मंगळवारी रास्तारोको करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजासोबतच येथील समस्त जातीधर्माच्या जणमाणसाने पाठींबा दर्शवित या आंदोलनात सहभाग नोंदवला. तसेच सोमासवाडी , बिजेवाडी , पानशेवडी व परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.

सकाळी ११ वाजता सुरुवात झालेला रास्तारोको तब्बल एक तास म्हणजेच दुपारी १२ वाजेपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक बंद करत झोपेचं सोंग घेत असलेल्या सरकार प्रति निषेध व्यक्त करत घोषणाबाजी दिली व नाराजी व्यक्त केली , यावेळी फुलवळ येथील सर्वच व्यावसायिकांनी आपापले दुकान , व्यवसाय बंद ठेवून या आंदोलनात सहभाग नोंदवला होता , या आंदोलन स्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती थोरात , कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यु.ए. खंडेराय , बिट जमादार संतोष काळे व त्यांचे सहकारी यांनी भेटी दिल्या व मोलाचे सहकार्य ही केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *