वार्ताहर ( परमेश्वर डांगे.)
बोगस व अवैध निविष्ठा विक्री करणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्यासाठी सध्या प्रचलित असलेल कायदे पुरेसे असतांनाही राज्य शासनाकडून नवीन कायदे करून कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. शासनाची ही बाब अन्यायकारक असल्याचा आरोप करून नवीन कायद्याच्या निषेधार्थ दिनांक २ ते ४ नोव्हेंबरदरम्यान तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय कंधार तालुका कृषी साहित्य विक्रेता संघटनेने घेतला आहे.याबाबतचे निवेदन सोमवारी कंधार तहसिलदार राम बोरगावकर यांना देण्यात आले आहे.
यावेळी तालुका कृषी साहित्य विक्रेता संघाचे अध्यक्ष भगवान डफडे
उपाध्यक्ष राजेश्वर मुत्तेपवार
सहसचिव सुभाष मठपती
खजिनदार संतोष गिते,हणमंत बोंबले,अरुण कागने,संदीप मुत्तेपवार, श्याम विश्वासराव,नाईक साहेब,संजय डावकोरे ,नामदेव बसवदे,कोंडावार सावकार
यांच्यासह मोठ्या संख्येने तालुक्यातील कृषी दुकानदार उपस्थित होते.
मान्यताप्राप्त निविष्ठांचे दर्जाबाबत कृषी विक्रेत्यांना दोषी समजु नये राज्यातील विक्रेते हे कोणत्याही प्रकारच्या कृषी निविष्ठांचे उत्पादन करीत नाहीत.कृषी विभागाच्या मान्यताप्राप्त कंपनीच्या कृषी निविष्ठा या सीलबंद पॅकींगमध्ये खरेदी करतात. शेतकऱ्यांना सीलबंद पॅकमध्ये विक्री करीत असल्याने व कृषी विभाग मान्यताप्राप्त निविष्ठांचे दर्जाबाबत कृषी विक्रेत्यांना दोषी समजण्यात येऊ नये.तसेच योग्य निविष्ठा विकणारे कृषी निविष्ठा विक्रेत्यावर जरब बसविण्यासाठी अन्यायकारी कायदे,जाचक नियम व अटी विक्रेत्यांवर लादू नयेत,अशी राज्यातील सर्व विक्रेत्यांची मागणी असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
*तालुक्यातील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय*
राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या कायद्याच्या निषेधार्थ ३० रोजी कंधार तालुका कृषि साहित्य विक्रेता संघाच्या वतीने तहसीलदार व गटविकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.महाराष्ट्र शासनाकडील प्रस्तावित विधेयक क्रमांक ४०, ४१, ४२, ४३ व ४४ मधील जाचक नियमांना विरोध करण्यासाठी व प्रस्तावित पाचही कायदे रद्द करण्यासाठी पहिल्या टप्यात २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत तालुक्यातील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे निवेदनात नमूद केलेआहे.