दिवाळी च्या निमित्याने फुलवळ येथिल शासकीय गुत्तेदार वैजनाथ सादलापुरे यांच्या तर्फे माजी अधिकाऱ्यांचा सत्कार

 

कंधार ; प्रतिनिधी

जुन्या आठवणीनां उजाळा देत  फुलवळ गावाला दिलेल्या विकासात्मक योगदानाबद्दल  दिवाळी च्या निमित्याने आज शासकीय ठेकेदार वैजनाथराव सादलापुरे  व नारायणराव पटणे यांनी  तत्कालीन फुलवळ ग्रामपंचायतचे विस्तार अधिकारी व ग्रामसेवक नरहरराव मारोतराव संगेवार (वय ८९ वर्षे) यांचा सपत्नीक सत्कार केला.

निमीत्य होतं… जुन्या आठवणी… फुलवळ गावाबाबतीत दिलेले योगदान… ती आपुलकी व स्नेह आजही कायम आहे हे विशेष म्हणजे कुठल्याही स्वार्थ नसताना मनसोक्त आनंद व गप्पा रंगल्या .

  जोपर्यंत  कायमस्वरूपी सबंध व स्नेह राहणार नाही तोपर्यंत ह्या आभासी जगात आपुलकी दिसणार नाही यांचे भान ठेवून नेहमी वैजनाथ सादलापुरे राहत असतात .

फुलवळ येथिल व्यंकटराव मंगनाळे , निळकंठराव मंगनाळे , जयवंतराव मंगनाळे , कलंबर साखर कारखान्याचे व्यवस्थापक जयवंतराव पाटील , तत्कालीन पोलीस पाटील नारायण आप्पा स्वामी , माजी सरपंच दिगांबर पटणे आदी दिग्गज मंडळी सोबत काम करत फुलवळ गावाची सेवा फुलवळ ग्रामपंचायतचे सेवानिवृत विस्तार अधिकारी व ग्रामसेवक नरहरराव  संगेवार यांनी दिल्याने सदरील सत्कार करण्यात येत असल्याचे माहीती वैजनाथ सादलापुरे यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *