सोशल मिडीयावर फराळाचे अनेक फोटो येत आहेत.. पण पूर्वी फराळाचा येणारा सुवास आता अजिबात येत नाही.. नुसती भाजणी भाजली तरी काय सुगंध यायचा ना.. बेसन भाजतानाचा खमंग वास तर चोहीकडे पसरायचा.. पिवळ्या मुगाचे लाडु आणि अनारसे मला खुप आवडतात.. अनारसे दर वर्षी मी आजही न चुकता करते.. आज सकाळी फेसबुकवर कोणीतरी पदर सुटलेल्या करंज्यांचा फोटो शेअर केला आणि मी माझ्या कोकणातील बालपणात गेले…
आठवला तो अंगणातला सागवानी झुला , आठवली ती शेणाने सारवलेली चुल आणि त्यावर ट्म्म फुगलेली तांदुळाची भाकरी आणि त्याच गरम तव्यावर केलेलं कुळथाचं सुकं पिठलं.. सगळं अगदीच साधं पण पौष्टिक आणि कोकणी माणसाकडे असलेली सगळ्याना आपल्यात सामावुन घेण्याची श्रीमंती.. आजही माझ्या अनेक मित्रांना मी माहेरी घेउन जाते तेव्हा त्यांनाही तिथे परकं वाटत नाही.. पावसजवळ एक छोटं खेडं..
तुम्ही कोकणातील भुताच्या गोष्टी वाचल्या किवा ऐकल्या असतीलच.. मी यात फार खोलात जात नाही कारण श्रध्दा अंधश्रद्धा हा प्रकार असतो.. पण याही योनी आहेत हे शास्त्र सांगतं मी नाही.. जन्म आणि शिक्षण कोकणात पण विचार एकदम परखड.. माझ्या माहेरी घराच्या दोन बाजूला एक देवीचं आणि एक शंकराचं अशी दोन मंदिरं आहेत.. देवीच्या देवळात कौल लावणं , नारळ ओवाळून टाकणं हे प्रकार रोजच चालायचे पण माझ्या घरातल्या लोकांनी ना याचा बागुलबुवा केला ना त्याबद्दल आमच्या मनात काही भरवलं.. कायमच उच्च विचारी माझं माहेर त्यात माझे चुलत काका खूपच धाडसी जशी मी आहे.. नारळ कोणीही ओवाळून टाकला की आवाज यायचा.. काका म्हणायचे , जा रे पोरानो , तो नारळ घेउन या.. आम्ही धावत जाऊन नारळ आणायचो .. काका फोडुन त्याचे तुकडे करायचे .. घरातुन गुळ आणायचा आणि मस्त अंगणात बसुन गुळ खोबरं खायचं..ओवाळून टाकलेल्या नारळाचं खोबरं खाऊन हा देह पोसला गेला.. कधीही कशाची भिती नाही .. ना त्याने कधी त्रास झाला.. याच खोबऱ्यापासुन एकदा पदर सुटलेल्या करंज्या बनवल्या होत्या त्याची आठवण आज प्रकर्षाने झाली.. ओवाळून टाकलेल्या नारळाच्या करंज्या जरा जास्तच खमंग लागायच्या.. हाहाहा..
आज दिवाळीची सुरुवात.. वसुबारस आहे..गाईची पूजा केली जाते…माझ्या सगळ्या वाचकांना , चाहत्याना , ट्रोलरना दिवाळीच्या असीम अनंत शुभेच्छा.. निरोगी आयुष्यासाठी मनापासून सदिच्छा..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi