डॉक्टर तुम्ही सुध्दा ??

 

अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे अनेक जण माझे मित्र आहेत.. Highly qualified म्हणावं तर फक्त डीग्रीने पण विचाराने ??.. मी लैगिंकतेवर जितकी बोलते लिहीते तितकीच अध्यात्मावर लिहीते बोलते.. दोन्हीत नक्कीच आनंद आहे पण अध्यात्मातील आनंद हा शाश्वत आहे.. जिथे दुख अजिबात नाही आणि त्यासाठी संसार सोडायची गरज नाही.. मग काय सोडायचय तर वाईट विचार .. चांगलं राहुन उत्तम संसार करुन आपल्याला नेमुन दिलेलं काम करत आपण भगवंताचं नामस्मरण करत राहिलो तर नुकसान नाही उलट आनंदच आहे.. अध्यात्माने आपण आतुन शांत होतो..
समाधानी , आनंदी राहायला हरीनाम खूपच उपयोगी आहे…
काल मी माझ्या डॉक्टर मित्राला भेटले.. जवळपास तासभर आम्ही सोबत होतो.. आमचे काही कॉमन फ्रेंड्स आहेत त्यामुळे काही कॉमन विषय निघतात.. अनेक विषयांवर चर्चा होते .. कधी मला त्यांच्याकडून काही मिळतं , कधी ते माझ्याकडून काही शिकतात.. मला विवीध लोकांना यासाठीच भेटायला आवडतं… वैचारिक देवाणघेवाण होते.. थोडं बोलुन झाल्यावर ते त्यांच्या मुळ पदावर आले.. मला सेक्स मधे फार रस आहे त्यावर मी म्हटलं , तुम्हालाच कशाला सगळ्या पुरुषांना असतो.. मी पुढे म्हटलं , पण हेच जर का कोणी अध्यात्मावर बोलायला लागलं तर ते ऐकण्याची लोकांची मानसिकता नसते .. त्यावर त्यांचं वाक्य आलं , अध्यात्माबाबत तुमचं काय मत आहे ?? .. मी भगवद्गीता शिकत असल्याने मी बोलायला सुरुवात केली आणि ते स्तब्ध झाले.. बापरे तुम्हाला हेही तितकच माहीत आहे… पुढे मी म्हटलं , कारण ते खूपच छान आहे.. कांदा लसूण का खाऊ नये असं अध्यात्मात सांगतात ?? किवा परान्न का घेउ नये ?? याची कारणे मी त्यांना सांगितली.. त्यावर डॉक्टर बोलले onion is gd for health.. त्यावर मी म्हटलं , कांद्यात सल्फर असतं मग ते कोबी फ्लॉवर यातही आहे.. आणि भगवंताला कोबी चालतो कांदा नाही कारण तो तामसी आहे..
आणि भगवंत सात्विक आहेत… डॉक्टरांची बोलती बंद झाली कारण हे शास्त्रात लिहीलय… मी माझ्या मनाचं काहीही सांगत नव्हते.. आपली मानसिकता चांगले विचार पटकन स्वीकारत नाही मग तो डॉक्टर असला तरीही.. आणि विशेष म्हणजे त्यांनी भगवद्गीता वाचलेय.. तरीही ते लैगिकतेत अडकुन होते आणि मी लैगिकतेवर लिहून , बोलुन मी त्यापासून अलुप होते.. कारण या दोन्हीत बॅलंस कसा करायचा ही कला मला अवगत आहे.. खुप जण मला हे विचारतात , तुला हे कसं जमतं ??.. दोन्ही विरूध्द आहेत तरीही एक आहेत कारण दोन्हीचा दुवा भगवंत आहेत.. भौतिक सुखात अडकायचं की शाश्वत हे आपण ठरवायचं.. त्यानंतर मात्र त्यांची देहबोली बदललेली दिसली , त्यांची बोलण्याची पध्दत बदलली कारण मी लैगिकतेपेक्षा अध्यात्मावर भरभरुन बोलत होते.. मला कमाल वाटली.. माझा मित्र असला तरीही आम्ही एकमेकांना अरे तुरे केलं नाही ना कधी शेकहॅंड कारण आदर हेच आहे बहुधा… पण त्यांना बदललेलं पाहून मनात अनेक विचार येउन गेले पण त्यावर विचार करुन हरीनामाचा मौल्यवान वेळ मला वाया घालवायचा नव्हता.. पुढे ते म्हणाले ,माणसं बदलतात ना.. मी म्हटलं , माणसं नाही बदलत त्यांच्या priorities बदलतात आणि त्यात गैर काही नाही.. एखादा व्यसनं सोडुन चांगल्या मार्गाला लागला तर तो बदल चांगलाच आहे आपण त्या गोष्टीचं कौतुकच करायला हवं कारण काळ हेच त्यावरचं औषध आहे.. आपल्या नजरेतुन आपण तसं पहातो म्हणुन म्हणावं वाटलं , डॉक्टर तुम्ही सुध्दा ??..
मी काउंसींग करताना मला असे अनेक अनुभव येतात त्यावेळी वाटतं , यांचं शिक्षण आणि बुद्धीमत्ता तितकीच पण इथे काय म्हणावं ?? … कोणीही वाईट नाही..निसर्गाने इतकी विवीध प्रकारची लोक बनवली आहेत की त्याचं परिमाण आपण लावूच शकत नाही.. प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार आपल्या आयुष्याचा अर्थ लावतो आणि जगतो त्यामुळे मांसाहार करणाऱ्याना त्यात गैर वाटत नाही .. मी सुध्दा १०० % फॉलो करत नाही पण प्रत्येकातलं चांगल वेचायचा नक्की प्रयत्न करत असते..मला आलेले अनुभव मी यासाठी शेअर करते कारण यातुन आपला अभ्यास होतो.. तुम्हीही अशा कॅरॅक्टरचा जरुर अभ्यास करा..

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *