कंधार ; दिगांबर वाघमारे
अपेक्षेपेक्षा कंधार तालुक्यात सरासरी पाऊस कमी झाला असून दुष्काळी परिस्थितीचे चिन्ह आहेत . तसेच खरीप हंगामा प्रमाणे रब्बी हंगामहि शेतकऱ्यांच्या हातून जाताना दिसत आहे . सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने तात्काळ शासनाने कंधार तालुक्याला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावी अशी मागणी तहसीलदार राम बोरगावकर व उपविभागीय अधिकारी कंधार यांच्यामार्फत कंधार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .
सद्यस्थितीत कमी पावसामुळे शेतकरी हवालदार झाला आहे . शेतीतून मिळणारी उत्पन्न नाही त्याचप्रमाणे शेतीला , जनावरांना पिण्यासाठी पाण्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे , अशा परिस्थितीत शासनाने कंधार तालुक्याला दुष्काळातून वगळण्यात आले आहे त्यामुळे सर्वत्र नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केल्या जात असल्याचे निवेदनात नमूद केले आहे .
तसेच शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी लिंबोटी धरण , बारूळ आणि विष्णुपुरी धरणातून कॅनल द्वारे तीन ते चार पाणी पाळ्या सोडाव्यात अशी ही मागणी या निवेदनात करण्यात आली .
यावेळी कंधार तालुका अध्यक्ष बालाजी पांडागळे , हमीद सुलेमान , एडवोकेट बाबुराव पुलकुंडवाड , संजय भोसेकर , मन्नान चौधरी , नागोराव पाटील मोरे ,रमेश ठाकूर , बाळासाहेब पवार , सुरेश कल्हाळीकर , अजय मोरे आदीसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते .