कंधारचे तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांचा विभागीय स्तरावर उत्कृष्ट अधिकारी म्हणून प्रमाणपत्र देऊन झाला सन्मान.
कंधार ; साईनाथ मळगे
कृषी विभागात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना त्यांनी कृषी खात्यात केलेल्या कामाची दखल घेऊन अशा अधिकाऱ्यांची उत्कृष्ट अधिकारी म्हणून जिल्हा व विभाग पातळीवर निवड करण्यात येत आहे.याच माध्यमातून तालुका कृषी अधिकारी या संवर्गातून तालुका कृषी अधिकारी कंधार या पदावर कार्यरत असलेले श्री रमेश देशमुख यांची विभाग पातळीवर उत्कृष्ट अधिकारी म्हणून निवड झाली असून त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे .विभागीय कृषी सहसंचालक आदरणीय तुकाराम जगताप ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आदरणीय रविशंकर चलवदे उपविभागीय कृषी अधिकारी आदरणीय आर टी सुखदेव यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कामाचा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांनी या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानले हा बहुमान कंधार तालुक्यात कार्यरत असलेले कृषी विभागाचे आत्माचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे व एकत्रीतपणे केलेल्या कामामुळे मिळाल्याचे त्यांनी सांगितले हा बहुमान कृषी खात्यातील माझे सहकारी मंडळ कृषी अधिकारी ,कृषी पर्यवेक्षक ,कृषी सहाय्यक तसेच कार्यालयात कार्यरत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना समर्पित केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.मा आमदार मा खासदार जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी प्रगतशील शेतकरी यांच्या सहकार्यामुळे तसेच कृषी विभागात होत असलेल्या कामांची पत्रकार बंधूंनी वेळोवेळी विस्तृत माहिती देऊन केलेल्या सहकार्यामुळे हा सन्मान मिळाल्याचे त्यांनी सांगितले. सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचे तसेच पत्रकार बांधवांचे आभार मानले.