अहमदपूर येथे उद्या 1 ऑगस्ट रोजी
रास्तारोको आंदोलन.
अहमदपूर(बालाजी काळे)
अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला सरसगट प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्यावे, दूध भुकटी निर्यातीला प्रतिकिलो 50 रुपये अनुदान मिळावे आणि गाईच्या दूध खरेदी दर 30 रुपये प्रति लिटर करावा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीने 1 ऑगस्ट 2020 रोज शनिवारी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक अहमदपुर येथे महाएल्गार आंदोलन करण्यात येणार आहे.
अकार्यक्षम महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यासाठी अहमदपुर तालुक्यातील गावागावातील दूध संकलन केंद्रावर शेतकऱ्यांनी 1 ऑगस्ट रोजी दूध घालू नये. कुठेही दुधाची नासाडी करू नये.तरी
भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतील राष्ट्रीय समाज पक्ष, रिपाई आठवले गट, शिवसंग्राम, रयतक्रांतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे.असे आवाहन
विनायकराव जाधव-पाटील ,
माजी राज्यमंत्री तथा प्रदेश सदस्य ,भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.