कंधार ;
गायरान शेत जमिनीवर अनाधिकृत केलेले अतिक्रमण हटविण्यासाठी दिनांक ८ सप्टेंबर रोजी पासून बौद्धद्वार वेस कंधार येथिल सुनिता अनिल सुर्ये यांनी अमरण उपोषण सुरु केले आहे.
याबाबत दि.८ रोजी तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले असून त्या निवेदनात असे नमूद केले की सुनिता अनिल सूर्य राहणार बोध द्वार्वेस कंधार तालुका कंधार येथील विधवा स्त्री असून त्यांचे शेत सर्वे नंबर 21 /17 मध्ये 1.60 आर शेत जमीन आहे. गावातील सय्यद इसाक करीम हा व्यक्ती माझ्या शेत जमिनीवर अनधिकृत बांधकाम केले आहे .मी याबाबतचा संदर्भ ने विषयावरून अर्ज दिला परंतु या बद्दल तहसील कार्यालयाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे दिनांक 15 ऑगस्ट 2020 रोजी आमरण उपोषणास बसणार होते परंतु माझी तब्येत बरी नसल्यामुळे व कोरोनाणा मुळे बसू दिले नसल्यामुळे आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी पासून शेतातील अतिक्रमण हटवले साठी आमरण उपोषण सुरू केली आहे .सदरील उपोषण हे शेतावरील अतिक्रमण हटवले शिवाय कुपोषण उठणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नांदेड ,उपविभागीय अधिकारी कंधार ,पोलीस निरीक्षक कंधार यांना देण्यात आले असून या अर्जावर सुनिता अनिल सुर्वे यांच्या स्वाक्षरी आहे.