जगासमोर सद्या कोरोनाचे महासंकट उभे असताना..शाळा बंद शिक्षण चालु या उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवरंगपुरा या शाळेने आवघे गावच शाळेत रुपांतर केले.
तालुक्यापासुन जवळच असलेले ,जगतुंग समुद्राच्या सानिध्यात व ऐतिहासिक किल्याच्या जवळ असलेले नवरंगपुरा हे गाव.गावात जिल्हा परिषदची पाचवी पर्यत शाळा असून या शाळेतील मुख्याध्यापक गोविंदराव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली युसूफ शेख व स्वाती मुंडे यांच्या कल्पनेतुन शाळा बंद व शिक्षण चालु या उपक्रमात गावातील भींतीवरच फळा तयार करुन भींती बोलक्या करुन विद्यार्थ्यांना अभ्यास उपलब्ध करुन दिला..
शासनाच्या नियमानुसार सोसल डिस्टंसिंग चे पालन व मास्क लावुन विद्यार्थी या शैक्षणिक फळ्याचा वापर करुन अभ्यास करताना दिसत आहेत..त्याच बरोबर नवरंगपुरा प्रस्तुत कोव्हिड फायटर माझा अभ्यास घरचा अभ्यास तयार करुन मुलांना त्यांच्या घरी मोफत मराठी ,गणित या विषयाचा अभ्यास वाटप करण्यात आला..
या शैक्षणिक फळ्यावर मराठी वर्णमाला..ईंग्रजी अल्फाबेटस,उजळणी ,गणिती क्रिया.शरीराचे अवयव.प्राण्यांची नावे..ईत्यादी शैक्षणिक फळे तयार करुन आनलाईन तसेच आफ लाईन अभ्यास देऊन .विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधीच उपलब्ध करुन दिली..आन लाईन शिक्षणात अनेक अडचणी येत आहेत त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे शेख युसूफ यांनी म्हटले आहे..या शैक्षणिक उपक्रमाचे स्वागत कंधार पंचायत समितीचे गटशिक्षणाधीकारी रविंद्र सोनटक्के भागशिक्षणाधिकारी अंजली कापसे व केंद्र प्रमुख धोंडीबा गुंटुरे .शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अताऊल शेख यांनी केले..असेच उपक्रम सर्व शाळेनी सोसल डिस्टंसिंगचे पालन करुन व मास्क वापरुनच करावे असे म्हटले आहे..