कंधार ;
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीत पात्र विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजनेंतर्गत उन्हाळी सुट्टीतील 34 कार्यदिनांकरिता अनुज्ञेय तांदूळ आणि मूगदाळ व हरभरा हा धान्यादी माल शाळांना वाटप करण्यात येणार आहे.*
शापोआ अंतर्गत प्राप्त तांदूळ व धान्यादी माल शाळेच्या शापोआ साठा नोंदवहीत नोंदवून घ्यावा. शाळा व्यवस्थापन समिती पदाधिका-यांना सदर शापोआ वाटपाबाबत अवगत करून स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन वाटपाचे नियोजन करावे.
सदर शापोआ वाटप सद्यस्थितीत आज रोजी पटावरील लाभार्थ्याना करण्यात यावे.
वर्गनिहाय विद्यार्थी/ पालकांना सोशल/ फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून खालील तक्त्यानुसार इयत्ता- 1 ते 5 आणि इयत्ता- 6 ते 8 साठी प्रति विद्यार्थी वितरणाचे प्रमाणात वाटप करण्यात यावे. सदर वाटपाची खालील नमुन्यात विद्यार्थीनिहाय नोंद करून वाटप पत्रकावर विद्यार्थी/ पालकांची स्वाक्षरी घ्यावी.
शाळा स्तरावर प्राप्त तांदूळ व धान्यादी वस्तूंचा तपशील (परिशिष्ट-क) केंद्र प्रमुखांना सादर करावा. केंद्र प्रमुखांनी केंद्रातील सर्व शाळांचे संकलन (परिशिष्ट- क) शिक्षण विभाग पंचायत समिती, येथे सादर करावे.
– गट शिक्षणाधिकारी,
पंचायत समिती, कंधार