माळाकोळी; एकनाथ तिडके
मागील अनेक दिवसांपासून माळाकोळी येथील दलित वस्ती परिसरातील तलावाकडे जाणारा रस्ता चिखलमय झाला होता व येथून नागरिकांना चालणे अवघड बनले होते सदर रस्ता दुरुस्त करण्यासाठी ग्रामपंचायत कडे विनंती करूनही ग्रामपंचायत रस्ता दुरुस्त करत नसल्यामुळे येथील युवकांनी एकत्र येत वर्गणी गोळा करून व श्रमदान करत रस्ता दुरुस्त केला आहे.
माळाकोळी येथील दलित वस्ती भागातील तलावाकडे जाणारा रस्ता मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असून या रस्त्याचे काम करण्यात आलेली नाही शिवाय गटाराचे पाणी सुद्धा या रस्त्यावर सोडले गेले असल्यामुळे सदर रस्ता बारमाही चिखलमय झालेला असतो, सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते, यामुळे या रस्त्यावरून नागरिकांना चालणे अवघड बनले आहे यामुळे सदर रस्ता दुरुस्त केला जावा अशी मागणी युवकांनी ग्रामपंचायत कडे केले होते मात्र ग्रामपंचायतीने आमच्या मागणीला प्रतिसाद दिला नाही असा आरोप या युवकांनी केला आहे, माळाकोळी येथील युवक निखिल मस्के , सुनिल कांबळे,संघपाल कांबळे,अविनाश जोंधळे,मनोज हनवते ,बालाजी कांबळे,धनराज जोंधळे,रामा कांबळे,राष्ट्रपाल कांबळे त्यांनी एकत्र येत वर्गणी गोळा करून सदर रस्ता दुरुस्त करण्याचा संकल्प केला त्यानुसार त्यांनी गोळा केलेल्या पैशातून रस्ता दुरुस्तीसाठी दगड आणले व स्वतः श्रमदान करून युवकांनी रस्ता दुरुस्त केला आहे यामुळे आता या रस्त्यावरून नागरिकांना काही काळापुरते का होईना वावरण्यास सोपे झाले आहे.
प्रतिक्रिया ***
ग्रामपंचायत स्तरावर दलित वस्तीच्या कामांसाठी लाखो रुपयांचा निधी येतो , मात्र तरीही येथील दलित वस्तीतील वर्दळीच्या रस्त्याची अवस्था फारच वाईट झाली होती याबाबत ग्रामपंचायत कसलाही प्रतिसाद देत नसल्यामुळे आम्ही युवकांनी एकत्र येत सदर रस्ता श्रमदानातून व वर्गणीतून दुरुस्त केला आहे यापुढे ग्रामपंचायत जोपर्यंत नागरिकांना प्रतिसाद देऊन कामे करणार नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीचा कर आम्ही भरणार नाही
निखिल मस्के युवक…