लोहयात तहसिलदारांना दिले निवेदन
माळाकोळी ; एकनाथ तिडके
शासनाने सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमामध्ये मंडप, कार्यालय, हॉल ,लॉन्स क्षमतेपेक्षा अर्ध्या असन समतेची परवानगी किंवा पाचशे व्यक्तीच्या उपस्थित कार्यक्रमाला परवानगी द्यावी अशी मागणी टेन्ट हाऊस ,मंगल कार्यालय ,डेकोरेशन ,वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने शासनाकडे केली असून या मागणीचे निवेदन संघटनेच्या वतीने लोहा तहसीलदारांना देण्यात आले आहे.
पुढे निवेदनात असे नमूद केले की , ऑल इंडिया टेन्ट डीलर्स वेल्फेअर नवी दिल्ली सलग्न ऑल महाराष्ट्र डीलर्स वेल्फेअर ऑर्गनायझेशन व संपूर्ण भारतातील शाखाची बैठक दिनांक 4 -8-2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेण्यात आली. चर्चेअंती केंद्रसरकारच्या रहात पॅकेज देण्याच्या संदर्भातील विषयानुसार चर्चा होऊन या पॅकेजमध्ये हॉस्पिटॅलिटी आणि इत्यादी क्षेत्रातील कोरोनाने प्रभावित व्यवसायांना सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकार मदत करण्याचा विचारधीन आहे. तेव्हा आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो त्या धर्तीवर महाराष्ट्रातील संबंधित व्यवसाय धारकांना मदत करावी अशी मागणी करण्यात आली.
तसेच कोरोना महामारीमुळे देश व देशांतर्गत व्यवसायिकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याअंतर्गत सामाजिक , वैवाहिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली .त्यामुळे टेन्ट मंडप केटरिंग बॅक्वेट हॉल डीजे साउंड लाईट डेकोरेशन इव्हेट व्यवस्थापक इत्यादी सेवा देणारे लाखो लोक प्रभावित होऊन आर्थिक अडचणीत आहेत आणि त्यामुळे मानसिक तणावाखाली येऊन आत्महत्या करण्यास प्रेरित होत आहेत.
भारत सरकारच्या आदेशान्वये पन्नास लोकांच्या उपस्थितीत हॉटेल बॅक्वेट हॉल मंडप फार्महाउस यात लग्न समारंभ करण्याची परवानगी आहे एवढ्या कमी संख्येत कार्यक्रम करण्यासाठी आयोजक सहमत नाही . व्यवसायात एवढा कमी संखेत कार्यक्रम केला तर त्याचा खर्चही निघत नाही त्यामुळे कार्यक्रम होत नसल्यामुळे संबंधित व्यवसायधारक व त्याच्यावर अवलंबून असलेले लाखो परिवारांना आर्थिक चिंतेने ग्रासले आहे.
संबंधित व्यवसाय धारकाच्या भावनाचा एक मताने सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये मंडप कार्यालय हॉल लॉन्स क्षमतेपेक्षा अर्ध्या क्षमतेची परवानगी देण्यात यावी किंवा पर्यायी पाचशे व्यक्तीच्या उपस्थित लग्न व इतर कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यात यावी तसेच केंद्र शासनाच्या सहाय्यता पॅकेज अंतर्गत टेन्ट मंडप केटरिंग बॅक्वेट हॉल डीजे,लाईट डेकोरेशन इव्हेंट व्यवस्थापक सहभागी भागीदार इत्यादीच्या आर्थिक अडचणीचा विचार करून याच्या सहकार्यासाठी शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी लोहा तहसीलदाराकडे टेन्ट हाऊस मंगल कार्यालय केटरर्स डेकोरेशन ओनर्स वेल्फेअर असोसिएन लोहा च्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी टेन्ट हाऊस मंगल कार्यालय केटरर्स डेकोरेशन ओनर्स वेल्फेअर असोसिएशन लोहा शाखेचे अध्यक्ष पुरुषोत्तम बालाजीराव खोडवे, उपाध्यक्ष शंकर गुणाजीराव खिचडे, सचिव मुदगल उत्तमराव धाबे, कार्याध्यक्ष संभाजी बाबुराव शिनगारे, कोषाध्यक्ष ध्यक्ष सुरेन्द्र अनंतराव जोशी , सहसचिव सुभाष नागोराव चव्हाण, सह कार्याध्यक्ष शेख गौस मुस्तफा, उपकोषाध्यक्ष नागनाथ सिताराम कांगणे, सदस्य बाळू बोरगावकर ,सचीन वाघमारे, मनोराज मस्के आदी उपस्थित होते.