कंधारच्या स्मशानभुमीत दिपोत्सव साजरा ; कंधार भुषण विठ्ठल पेंटर यांचा अनोखा उपक्रम

 

कंधार ; दिगांबर वाघमारे )

दिवाळी हा आनंदाचा सण आहे , दिव्याच्या प्रकाशात रोषणाही व फटाके आणि फरळाचा आस्वाद घेत ठीक ठिकाणी दिवाळी उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होत आहे . कंधार भूषण पेंटर विठ्ठल मुनगिलवार यांनी पुढाकार घेत कंधारच्या स्मशानभूमीत दिवाळी साजरा करत दिव्याची आरास , शेकडो दिवे व फटाक्याच्या अतिषबाजी करत अगळा वेगळा दीपोत्सव साजरा केला आहे .

 

गेल्या वर्षीपासून विठ्ठल मुनगिलवार पेंटर हा उपक्रम स्मशानभूमीत राबवत आहेत . जीवनाचे अंतिम ठिकाण आणि जीवनातील शेवटचा संस्कार या ठिकाणी होतो , म्हणून दीपोत्सव स्मशानभूमीत साजरा करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली .

प्रशांत फुके , गिरीश केंद्रे , रवी सिद्धनाथ , सार्थक पाठक , शाम यांच्यासह स्मशानभूमीतील कर्मचारी यावेळी उपस्थित होते .

 

 

पेंटर विठ्ठल मुनगिलवार हे कोरोना काळात स्वतःच्या पैशाने हजारो संदेश पोस्टर व भिंती फलक लिहून चौकात हॉटेल व सरकारी कार्यालयामध्ये कोरोना बाबत जनजागृती केली होती . त्यांच्या कार्याचे दखल घेऊन कै . दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान व हिंदवी बाणा लाईव्ह यांच्या वतीने कंधार भूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते .

 

 

त्यांच्या या दीपोत्सवाची चर्चा कंधार शहरात सर्वत्र होत आहे .

 


 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *