माळाकोळी; एकनाथ तिडके
महान तपस्वी संत राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना भारतातील सर्वोच्च असलेला नागरी सन्मान “भारतरत्न” पुरस्कार देण्यात यावा यासाठी केंद्र सरकारकडे राज्य सरकारने शिफारस करावी अशी मागणी कंधार लोहा विधानसभा मतदार संघाचे आमदार शामसुंदर शिंदे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.2आमदार शामसुंदर शिंदे यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी निवेदन देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबत मागणी केली आहे, वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांचे सांस्कृतिक कार्यामध्ये मोलाचे योगदान असून वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळूनही महाराजांनी धर्माचरण आणि ज्वलंत राष्ट्रवादाला वाहून घेतले विविधता आणि अमोघ वाणी यामुळे समाजाने त्यांना “राष्ट्रसंत” म्हणून मानाचे स्थान दिले , त्यांनी धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले, धर्मप्रसाराबरोबरच त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले आहे , महाराजांचे कार्य त्यांच्या लिंगायत अनुयायांसह इतर समाजासाठी मार्गदर्शक असून अध्यात्मप्रसार वृक्ष जोपासणा , राष्ट्रधर्म या त्रिसूत्रीवर त्यांनी केलेले काम हे अविस्मरणीय आहे तसेच लिंगायत स्वतंत्र धर्म आंदोलनात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. आयुष्यभर समाजसेवेचा विडा उचलून सर्वसामान्य जनतेला अध्यात्मिक धडे देणाऱ्या राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कार्याचा शैक्षणिक पाठ्यपुस्तकात समावेश व्हावा . आणि महाराष्ट्रात जन्मलेल्या भारतमातेच्या या महान पुत्रास सर्वोच्च “भारतरत्न” प्रदान करण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात यावी अशी मागणी आमदार शामसुंदर शिंदे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.