प्रतिनिधी, कंधार
भारतीय संविधान दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवार, २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान, दादर, मुंबई येथे संविधान सन्मान महासभा आयोजित करण्यात आली आहे. या महासभेला कंधार तालुक्यातील समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राजरत्न उर्फ बबन जोंधळे यांनी केले
या महासभेला वंचित बहुजन
आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर संबोधित करणार आहेत.
या संविधान सन्मान महासभेला कंधार तालुक्यातील भारतीय संविधान प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे संतोष
गवारे, प्रेमानंद गायकवाड, सुमेध पवार, मोहसिन स.मोईन, राजरत्न उर्फ बबन जोंधळे, विहान कदम, कांबळे, नामदेव कांबळे, जितेंद्र ढवळे, निलेश गायकवाड, दिलीप जोंधळे, नाना गायकवाड, आर.एन. गायकवाड, सुदाम मोडके, बळीराम कांबळे आदींनी केले आहे.