काय टायटल देउ ??..

जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या कामाने कर्तृत्वाने मोठी असते त्याला आपण सेलीब्रेटी म्हणतो पण मी स्वतःला एक स्टुडंट म्हणते कारण सोशल मिडीयावर सक्रीय रहाणं हे माझ्यासाठी माझ्या कामाचा सेवेचा भाग आहे आणि त्याचसोबत तो स्वतःला जाणुन घेण्याचा एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे.. कधी या प्लॅटफॉर्मवर गाडी थांबणार आहे तर कधी गाडी चुकणार आहे तर कधी चुकीची ट्रेन पकडली गेल्याने आपण पुन्हा नवीन प्लॅटफॉर्मवर उतरुन स्वतःला सिध्द करायला सज्ज असणार आहोत..
आता हे सगळं मी माझ्याबद्दल लिहीणार आहे कारण फोटो रील्स अनेक विषयावर मार्गदर्शन करताना अनेक गोष्टीचा अभ्यास करताना अनेक नवीन गोष्टी या विध्यार्थीनीला शिकायला मिळतात .. आपण कुठे आहोत याची जाणीव होते..निसर्गापुढे आपण कोणीच नाही हेही पदोपदी लक्षात येते .. No one is celebrity.. but everyone is celebrity..
…. मी दोन तासापूर्वी टाकलेल्या फोटोवर कमेंट येतात..Yu r gorgeous .. yu r beautifull..ब्लाब्ला.. दोन तासानंतर एखाद्या फोटोत एखादी बट ग्रे दिसली तर हीच मंडळी म्हणतात , मॅडम वय झालं..म्हणजेच याचा अर्थ काय की एकतर तर आधी खोटं बोलत होते की आता ते फॅक्ट स्विकारत आहेत हा प्रश्न पडतो.. पण हे वाचल्यावर मला हुरळुनही जायचे नाही किवा वाईटही वाटुन घ्यायचं नाही कारण या प्लॅटफॉर्मवर अनेक गाड्या येणार आहेत.. सगळ्या एसी नसतील किवा सगळ्या स्लो किवा फास्टही नसतील.. या प्लॅटफॉर्मचा उपयोग त्या वेळच्या आपल्या आनंदासाठी करायचा आणि विद्यार्थी राहुन आयुष्यभर शिकत रहायचं कारण शेजारी असणारा पॅसेंजर हा कधी कोण असेल आपल्याला माहीत नाही .. त्यामुळे मी कोण आहे याचा गर्व तर नसावाच पण कोणामुळे आपण इथे आहोत याची जाण असायलाच हवी..
काल माझ्याहातुन घडलेल्या चुकीबद्दल इथे लिहुन माफी मागायची आहे.. मी कॉफी कट्ट्यावर वारजे हायवेला फोटो काढत होते.. एक व्यक्ती माझ्यासमोर येउन थांबली .. मला वाटलं त्यांना शेजारच्या टेबलवर बसायचय.. त्यांना म्हटलं ,,You can sit.. .. त्यावर ते जे बोलले ते मी पुसटसं ऐकलं ते म्हणाले , त्यांना मला भेटायचं होतं कदाचित माझे वाचक ,चाहते असतील त्यावेळी मी त्यांच्याशी बोलायला हवं होतं आणि माझा स्वभाव हा अगदीच मोकळा आहे.. मी सगळ्याशी बोलते मग ते दोन मिनीटे तिथे थांबूनही मी का त्यांच्याशी बोलले नाही??. मी फोटो काढण्यात व्यस्त होते… ते गेल्यावर मला नक्कीच वाईट वाटलं. हा लेख जर त्यांनीआज वाचला तर त्यांनी मला माफ करावं कारण ती घटना नकळत घडली पण त्यांना कदाचित तो गर्व वाटु शकतो.. अशा अनेक गोष्टी सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर घडतात.. मेसेजेस ला रीप्ल्याय दिला नाही तर लगेच बोललं जातं ही गर्विष्ठ आहे त्यावेळी जाणवतं की तुम्ही काहीतरी असणं हे जितकं वरदान आहे तितकाच तो शापही आहे..
मी बसले की अनेक गोष्टीचा संबंध लावते.. अनेक घटनांचा अभ्यास करते अनेक व्यक्तीना आणि त्यांच्या प्रवृत्तीला जाणुन घ्यायचा प्रयत्न करते तेव्हा जाणवतं की आपण कोण आहोत ??.. त्याचं उत्तर येतं कोणीच नाही.. पण तरीही हे मला करायच आहे आणि आनंद घ्यायचा आहे.. मग आनंद घेण्यासाठी सेलीब्रेटी लेबल का असावं ना.. काहीही गरज नाही.. मी कधीही शांत बसत नाही.. माझ्या मेंदुला सतत काहीतरी खुराक हवा असतो.. मी सतत काहीना काही शेअर करत असते आणि पुढे काय ??या प्रश्नाचं उत्तर काहीच नाही असच आहे .. कारण जसं या लेखाला टायटल नाही तसच या आयुष्यालाही टायटल नाही हेच खरं..
आपण कोणीतरी आहोत म्हणत जगण्यापेक्षा कोणीच नाही म्हणत जगायला जास्त मज्जा येइल.. माझ्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येकाची मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते..भविष्यात माझ्या हातुन चुकून कोणाला इग्नोअर केलं गेलं तर ते नकळत असेल .. जाणूनबुजून मी कधीही अशी वागत नाही..
कुठल्या ना कुठल्या प्लॅटफॉर्मवर भेट होइलच.. भेटु नक्की..

सोनल गोडबोले ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *