महात्मा फुले यांना स्मृतीदिनी अभिवादन ; द्वितीय सत्रातील शाळेचा पहील्या दिवशी कंधारच्या महात्माफुले प्राथमिक शाळेत पाठ्यपुस्तक वाटप

 

कंधार ;   प्रतिनिधी

येथिल महात्मा फुले प्राथमिक शाळेत महात्मा ज्योतीबा फुले यांचा स्मृतीदिन दि २८ नोव्हेबर रोजी कंधार येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत अभिवादन करण्यात आले .

तसेच द्वितीय सत्रातील शाळा सुरु झाल्या असून शाळेच्या पहीला दिवशी विद्यार्थांना शालेय पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले . यावेळी विद्यार्थांनी महात्मा फुले यांच्या स्मृती दिना निमित्त कु अदिती कागणे , सोनपरी हेंडगे , आरोही जोंधळे यांनी भाषणे केली .

शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे डी.जी , शिक्षिका सौ कागणे यु.एम , शिक्षक आनंदा आगलावे , आर एस केंद्रे , बोरकर सर बालकताई तेलंग आदीसह विद्यार्थी उपस्थित होते .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *