कंधार/प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नांदेडच्या कार्यकारिणीची नुकतीच निवड प्रक्रिया पार पडली.खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे खंदे समर्थक,विश्वासु व निष्ठावंत असलेले बालाजी पाटील तोरणे उमरजकर यांची भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कंधार येथील साई सदन निवासस्थानी दि २५ नोव्हेंबर रोजी लोहा/कंधार विधानसभा प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते निवडीचे त्यांना पत्र देण्यात आले.
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची पुर्व तयारी म्हणून मतदार संघातील नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.यामध्ये तरुण युवकांना स्थान देण्यात आले.
बालाजी पा.तोरणे उमरजकर यांना पक्षाने भाजपायुमो कंधार तालुका सरचिटणीस म्हणून काम करण्याची जबाबदारी दिली होती.त्यांनी ती जबाबदारी चोखपणे बजावली व पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी विविध कामे केली. त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.
या निवडीबद्दल नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर,लोहा कंधार विधानसभा प्रमुख प्रविण पाटील चिखलीकर,महाराष्ट्र भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सौ.प्रणीताताई देवरे चिखलीकर,भाजपा जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, भाजपा तालुकाध्यक्ष किशन डफडे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव राठोड,भाजपा जिल्हा विस्तारक ॲड.गंगाप्रसाद यन्नावार,विस्तारक साईनाथ कोळगीरे , मधुकर पा.डांगे,यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.बालाजी पा.तोरणे उमरजकर यांच्यावर विविध क्षेत्रातील मित्रमंडळी कडून अभिनंदनाच्या वर्षाव होत आहे.