लोहा ; प्रतिनिधा
लोहा तालुक्यात आवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे वतीने आज दि १ डिसेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले
लोहा तालुक्यात आवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून त्यामुळे.शिव सेना.उ.बा सा . ठाकरे गटाचे लोहा व दक्षिण नांदेडचे तालुकाध्यक्ष व इतर शिवसेना पक्षा पदाधिकारी यांच्या वतीने लोहा तहसीलदार यांना निवेदन देऊन तात्काळ पंचनामे करण्याचे सांगण्यात आले.
अतिवृष्टी व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या या विषयाचे निवेदन तहसिलदार लाड यांना देतांना नांदेड द. (उबाठा) शिवसेना तालुका प्रमुख पदमाकर पाटील सावतं यावेळी लोहा तालुका प्रमुख सुरेश पाटील हिलाल, तालुका संघटक गणेशराव मोरे, उपजिल्हा प्रमुख बाबुराव मोरे, माजी जि.प.सदस्य विठठल शेटकर, सरपंच बालाजी पवार, चंद्रकांत पाटील आडगांवकर, शेषराव दिघे, संजय येवले आदी सह शेतकरी उपस्थीत होते.
(छाया- विनोद महाबळे)

