प्रतिनिधी;
लोहा-कंधार मतदारसंघात दिनांक 27,28 नोव्हें रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मतदारसंघातील शेतकरी बांधवांचे तूर, हरभरा, कापूस, गहू, केळी ,ऊस, हळद सह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकरी बांधव प्रचंड आर्थिक अडचणीत आला असल्यामुळे प्रशासनाने अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात मतदारसंघातील नूकसानग्रस्त शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्याची सूचना लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय ,कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी लोहा,कंधार तहसीलदारांना दिले आहेत.
अवेळी पाऊस, गारपीट व अवकाळी पावसामुळे या अगोदरही मतदारसंघातील शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडला असून मी मतदारसंघातील शेतकरी बांधवांच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभा असून शेतकरी बांधवांनी कदापि खचून जाता कामा नये, लोहा-कंधार मतदारसंघातील नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपोटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरीव आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी बोलताना सांगितले.