लोहा येथिल कॅरम स्पर्धत राज्यासह परराज्यातील खेळाडूंचे अटीतटीचे 64 सामने ;कै.अनिल पाटील शिंदे यांच्या स्मरणार्थ आयोजन … प्रथम पारितोषक हैद्राबाद येथील अहेमद भाई यांनी पटकविले

 

लोहा (प्रतिनिधी )

लोहा येथे कै.अनिल पाटील शिंदे साहेब व वस्ताद लहुजी साळवे यांची 229 वी जयंती आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुणयतिथीनिमित्त कॅरम स्पर्धा 2023 स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत एकूण 64 सामने झाले व अतिशय उत्कृष्ठ खेळाडू फक्तं महाराष्ट्रातून च नाही तर हैद्राबाद, बिदर , व इतर राज्यातून ही खेळाडू आले होते. दरवर्षी प्रमाणे मा. सुनील पाटील शिंदे साहेब ( IRTS) भारतीय प्रशासकीय सेवा यांच्या मार्गदर्शनातून व यांच्या वतीने सर्व खेळाडूंना ट्रॉफी 🏆 व रोख रक्कम पारितोषक देऊन सन्मान केला जातो.

 

या वर्षी प्रथम पारितोषक हैद्राबाद येथील श्री अहेमद भाई यांनी, द्वितीय पारितोषक लोह्यातील श्री रत्नपाल येवले, तृतीय पारितोषक श्री समीर भाई नांदेड व चतुर्थ पारितोषक श्री बालाजी दाढेल लोहा यांनी मिळवले.

 

या कार्यक्रमा साठी सर्व आयोजन व परिश्रम दाढेल कॅरम हाऊस लोहा व श्री पांडुरंग दाढेल यांनी घेतले.
बक्षीस वितरण करण्यासाठी सेवानिवृत्त सहा. पोलीस उमहानिरीक्षक श्री गणेशराव पाटील कदम, श्री प्रदीप पाटील हिपरगेकर, श्री नामदेव पाटील चव्हाण, माजी नगर सेवक शरफोदिन शेख, मा. नगरसेवक अनिल दाढेल, नगरसेवक प्रतिनिधी प्रश्यांत खिल्लारे , पांडुरंग दाढेल, व सर्व कॅरम प्रेमी उपस्थित होते .

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *