शिवदूतानी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा पुन्हा डौलाने फडकण्यासाठी शिवदूतानी कार्यरत रहावे. – आशिष आजगावकर

 

 

कंधार  ; प्रतिनिधी
 पक्षप्रमुख उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या शिवदूतानी काटेकोरपणे कार्य केले तर येणारी विधानसभेवर भगवा फडकणार असे प्रतिपादन लोहा-कंधार विधानसभा संपर्कप्रमुख आशिष आजगांवकर यांनी कंधार येथे केले.
लोहा-कंधार विधानसभा संपर्कप्रमुख आशिष आजगांवकर यांचे कंधार येथील सिंहगड शिवसेना संपर्क कार्यालयात तालुकाप्रमुख परमेश्वर पाटील जाधव यांनी स्वागत केले.

 

यावेळी लोहा-कंधार विधानसभा संघटक गणेश कुंटेवार,किसान सेनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील कदम,तालुका संघटक पंडित देवकांबळे,शहरप्रमुख अतुल पापीनवार यांची प्रमुख उपस्थिती होती.उपस्थित शिवदूताना मार्गदर्शन करताना विधानसभा संपर्कप्रमुख आजगांवकर म्हणाले की आज पक्षाकडे काही नसताना सुद्धा उध्दवजीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इतर पक्षातील नेते मंडळीची शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेत आहेत.एकमेकांची उणीधूणी काढण्यापेक्षा पहिल्यांदा शिवदूतानी उध्दवजीनी मतदारसंघाची मागीतलेली माहिती सत्य पुरवावी जेणेकरून आपणास आपली ताकद समजणार आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मशाल ही निशाणीने आपली गद्दारांना शिक्षा देण्याची ताकद दाखवायची आहे.आज तुमच्या सारखा तळागाळातील शिवसैनिक उध्दवजी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.

यावेळी शिवदूतानी आपले विचार व्यक्त केले.शिवदूत व्यंकटी सोनटक्के,शिवाजी आंबेकर,नामदेव गंगोत्री,शिवाजी पवार,बालाजी सोनवळे यांच्या सह सर्कलप्रमुख,उपसर्कलप्रमुख, शाखाप्रमुख,गणप्रमुख, युवासेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.बैठकिचे सुत्रसंचलन गणेश कुंटेवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *