लोहा ; प्रतिनिधी
उत्तम पांडुरंग जोगदळे वय ४८ वर्षे धंदा मजुरी रा. डोलारा ता. लोहा जि. नांदेड येथील रहीवाशी आहे. हे की माझे राशन कार्ड आय डी नं.२७२०२८४४६५१० हे असुन माझ्या कुटुंबात एकुण
७ माणसे आहेत.
माझे राशन चालु असतांना मी दिनांक २५/१०/२०२३ गंजी राशन दुकानावर राशन घेण्यासाठी गेलो असता मला माझे राशन दिले नाही. व अचानकपणे म्हणले की तुमचे वरुनच बंद झाले आहे. मी त्यांना विचारले की, कोणत्या कारणांमुळे माझे राशन बंद झाले आहे. तरी राशन दुकानदार मारोती गोविंदराव बेटकर यांनी मला अरेराईच्या भाषेत म्हणाले की, तुझे राशन माइयाकडे आलेले नाही, तुला काय करायचे ते कर, मी तुझे राशन देवु शकत नाही.अशी अरेराईची भाषा वापरली आहे.
सदरील गावातील राशन दुकानदार हा माझ्या सोबत प्रत्येक बेळेस मी राशन घेण्यासाठी राशन दुकानला गेलो की मला अरेराईची ‘भाषा बोलतो, मला तक्रार करण्याची तक्रार यही देत नाही. आणि तसेच राशनची मशीन व्दारे निघालेली पावती पण कोणालाच देत नाही. असे माझ्या गावातील राशन दुकानदार गैरकृत्य करत आहे.
या संदर्भात वरील संदर्भा नुसार मी आपल्या कार्यालयाला दिनांक ३०/१०/२०२३ रोजी अर्ज देवुन विनंती केली की, माझे राशन चालु करण्यात याचे व दोषीवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी परंतु अध्याप पर्यंत माझे राशन चालु झाले नाही व मला दिपावली चे सुध्दा राशन मिळालाले नाही. आणि तसेच मी. डोलारा ता. लोहा या गावातील सर्व राशन धाराकांची यादी व युनिट यादी देण्यात यावी.
मी अंत्यत गरीब माणुस आहे. मोलमजुरी करुन मी माझी व माझ्या कुटुंबाची उपजिवीका भागवीत आहे. आणि त्याच्यात माझे राशन बंद झाल्याने माझ्यावर च माइया कुटुंबावर उपासमारीचे वेळ आलेली आहे.
तरी मा. साहेबांना विनंती की, सदरील प्रकरणाची योग्य ती चौकशी दिनांक ३०/११/ २०२३ रोजी पर्यंत करुन मला राशन मिळवुन द्यावे व दोषींवर योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा दिनांक ०१/१२/२०२३ रोजी पासुन मी.ग्रा.पं.का. डोलारा ता. लोहा येथे आमरण उपोषणास करण्यात येईल यांची नोंद घ्यावी असा ईशारा दिला होता .
त्यानुसार दि .०१/१२/२०२३ रोजी पासून उमरण उपोषण सुरू केले आहे.