राष्ट्रीय पातळीवरील रायफल शूटिंग मध्ये यश मिळवलेल्या कंधारच्या मिर्झा अथर बेग चा भोसीकर परिवाराच्या वतीने सत्कार

 

कंधार ; प्रतिनिधी

नुकतेच दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पातळीवरील रायफल शूटिंग मध्ये कंधारचे मिर्झा अथर बेग यांनी नॅशनल रेनॉल्ट शूटरचा पुरस्कार रायफल शूटिंग मध्ये पटकावल्याबद्दल नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या .

 

कंधार येथिल निवासस्थानी सदर सत्कार करण्यात आला . यावेळी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर,मुख्याध्यापक बसवेश्वर मंगनाळे,पत्रकार मोहम्मद अन्सारोदिन, विठ्ठल गिरी महाराज, विश्वाबर भोसीकर आदीची यावेळी उपस्थिती होती .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *