कंधार ( प्रतिनिधी )
हिंदवी बाणा च्या वर्धापण दिना निमित्ताने गेल्या सहा वर्षापासुन कै. दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठाण च्या वतिने पत्रकारांना पुरस्कार देवून गौरव केला जातो. राज्यातील नामवंत पत्रकार व नांदेड, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहुर, उमरी, मुदखेड, भोकर, अर्धापुर, धर्माबाद, बिलोली, नायगाव, देगलुर, मुखेड, कंधार, लोहा या १६ तालुक्यात प्रत्येकी एका पत्रकारास पुरस्कार देवून गौरव केला जातो.2023 च्या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन कै.दुर्गादास सराफ प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.
हिंदवी बाणा च्या वर्धापण दिनाचे औचित्य साधुन पत्रकारांचा सन्मान झाला पाहिजे या हेतुन गेल्या पाच वर्षापासुन पत्रकारांना पुरस्कार देवून गौरव केला जातो.दरवर्षी राजकीय व पत्रकारीता क्षेत्रातील नामवंत आजी माजी मंत्री या पुरस्कार सोहळाव्यास उपस्थित असतात.या अगोदरच्या सोहळाव्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण , शिवसेना उबाठा नेते संजय राऊत, विलास आठवले, रविंद्र तहकिक ,शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे , पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे भाजप गटनेते एकनाथ पवार, लोकशाही न्यूजचे वृतनिवेदक ऋषीदेसाई या मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला होता.
पत्रकारांचा सन्मान झाला पाहिजे हाच या प्रतिष्ठाणचा मुख्ये उद्देश आहे. हा पुरस्कार शिफारस किंवा ओळख पाहुन नाही तर त्यांच्या कार्यावर व लिखानावर दिल्या जातो. त्यामुळे नांदेड जिल्हातील १६ तालुक्यातील पत्रकार बांधवानी दि. 28 डिसेंबर पर्यंत आपला प्रस्ताव व बातमीचे कात्रण , आपला बायोडाट खालील whatsapp नंबरवर पाठवावे. संपादक माधव भालेराव- ९४२०३१२२४२ मिर्जा जमीर बेग ९९७५९ ६७९००, दिगांबर वाघामारे ९८६०८०९८९४ ,मोहमद सिंकदर ९९६०४३४६५९ , एस.पी.केंद्रे ९७६६२३५१०४ , प्रा . भागवत गोरे ७५०७५९९७५३ , प्रा .सुभाष वाघमारे ९९२३९७१४०१ या whatsapp नंबर वर पाठवावा .दिनांक 31 डिसेंबर रोजी प्रतिष्ठान च्या व जेष्ठ पत्रकारांच्या मार्गदर्शनाखाली छानणी करुन १ जानेवारी 2024 रोजी पुरस्कार प्राप्त पत्रकारांच्या नावाची घोषणा केली जाईल. या पुरस्कार व पत्रकारांचा सन्मान या कार्यक्रमासाठी मंत्री मोहदय किंवा एखाद्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांना नियंत्रीत केले जाणार असुन पुरस्कार वितरणाची तारीख जाहिर करण्यात येईल तरी पत्रकारांनी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावा. असे अहवान कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान व हिंदवी बाणा च्या वतिने करण्यात आले आहे.
2022 – क्षणचित्रे