कंधार ; प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या लढ्यात एक शूर सैनिक म्हणून लढत असतांना कंधार येथे संपन्न होणाऱ्या विराट सभेच्या नियोजनार्थ कंधारला येताना अपघातात हौतात्म्य पत्करलेल्या चोंडी ता.लोहा जि.नांदेड येथील बालाजी जाधव यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून मराठा योद्धा आदरणीय मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या आवाहनानुसार प्रा डॉ पुरुषोत्तम धोंडगे यांच्या वतीने जाधव कुटूंबीयांना रु.1,00,000/-( एक लाख) रुपयाचा धनादेश देऊन समाजबांधव या नात्याने सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.