कंधार ; प्रतिनिधी
मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या आदेशाचे पालन करून कंधार – लोहा तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून शहिद बालाजी नारायण जाधव रा. चोंडी ता. लोहा यांच्या कुटुंबीयास सहा लाख पंचेहात्तर हजार (पावने सात)लाखांची आर्थिक मदत आज केली .
मराठा योद्धा मनोज पाटील यांची कंधार येथे दि. ८ डिसेंबर रोजी सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेच्या नियोजनाच्या तयारी साठी लोहा तालुक्यातील चोंडी येथील मराठा स्वयंसेवक बालाजी जाधव हे दुचाकीने कंधार येथील सभास्थळाकडे जात असताना घोडज नजिक मोटारसायकल अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सभा आटोपल्यानंतर जरांगे पाटील यांनी चोंडी येथे जाऊन जाधव कुटुंबीयांची संत्वन भेट घेवून त्यांना धीर देत लोहा व कंधार तालुक्यातील सकल मराठा समाजाला उद्देशून जाधव कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले होते.
त्यास प्रतिसाद देत दोन्ही तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी निधी संकलन करून मयत जाधव कुटुंबीयास ६ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मदत म्हणून देण्यात आला.