१९७१ च्या भारत-पाक युध्दात भारताने विजय मिळविल्याचा ५२ वर्धापन दिन साजरा.

कंधार ; प्रतिनिधी

भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या एक दिवस आधीच भारताची धर्माच्या आधारावर फाळणी झाली.ही खंत भारतीय जनमानसात दिसू लागली.पण पाकिस्तान देशाची फाळणी होवून वेगळा बांगलादेश अस्तित्वात यावा ही अपेक्षा अवामी लीग या पक्षाला होती.वंगबंधू शेख मुजबूर रहमान यांच्या नेतृत्वात सुरु झालेल्या ठिगणीवर स्वातंत्र्य मिळवुन घेण्याचा भडका उडाला.राष्ट्राध्यक्ष याह्याखाॅन यांनी अवामी लीग नेत्यांचा व्देश सुरुच ठेवला.

या प्रकरणात भारताने शेजार धर्माची भुमिका चोख बजावली.तेंव्हा १६ डिसेंबर १९७१ रोजी भारतीय शूर जवानांनी बजावलेल्या कामगीरीने पाकिस्तानचे ९३ हजार रेंजर्सनी बिनशर्त गुडघे टाकुन शरणागती पत्करली अन् बांगलादेश स्वतंत्र होऊन भारत-पाक युध्दात भारताने विजय मिळविला.आज कंधारच्या विजय गडावर श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार संस्थेच्या वतीने श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार या ज्ञानालयाने पुढाकार घेऊन “जय बांगला विजयी स्मारक” भारतीय सैनिकांच्या कर्तबगारीला ५२ व्या वर्धापन दिनी मानाचा मुजरा!

य सैनिकांच्या कर्तबगारीस व या लढ्यात धारातीर्थी पडलेल्या शूर शहीदांना अभिवादन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार यासंस्थेचे सचिव,पंचायत समिती माजी सभापती व माजी आमदार मा. भाई गुरुनाथरावराव कुरुडे साहेब हे लाभले होते.तर प्रमुख पाहूणे माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.बालाजीराव चुकलवाड व माजी सैनिक पोचिराम वाघमारे,माजी सैनिक कल्याणकर आणि प्रमुख वक्त्या प्रा.विद्याताई फड मॅडम,श्री शिवाजी विद्या मंदिर कंधारचे मुख्याध्यापक मा.संभाजीराव उंद्रटवाड, श्री शिवाजी प्राथमिक विद्या मंदिर मुख्याध्यापक मा.हरिभाऊ चिवडे उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात वंदेमातरम राष्ट्रीय गीताने सुरुवात होवून ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सदाशिव आंबटवाड यांनी केले.प्रमुख वक्त्या प्रा.विद्याताई फड मॅडम यांनी १९७१ च्या भारत-पाक युध्दाची आभ्यास पूर्ण माहिती सांगत तत्कालीन परिस्थिती लाइव करण्याच्या प्रयत्न केला.माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजीराव चुकलवाड यांनी या जय बांगला स्मारकाचा विकास व्हावा.कारण भारतीय शूर जवानांनी केलेल्या शौर्याचे प्रतिक म्हणून आपल्या कंधार शहराचे ठळक वैशिष्ट्य वाटते.५२ वर्षापूर्वी हे स्मारक भारतात एकमेव याची दुरावस्था दूर करण्यासाठी कंधारकरांनी पुढाकार घेऊन या विकास करावा.आमची माजी सैनिक जिल्हा संघटना सहकार्य करण्यास तयार आहे.असे मत व्यक्त केले.तर अध्यक्षीय समारोपात माजी आमदार व स्मारकाचे साक्षीदार मा. भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब यांनी मनोगत व्यक्त करतांना तत्कालीन परिस्थिती आपल्या वाणीतून जिवंत केली.

 

आम्ही डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांचे सोबत अनेक कार्यकर्त्यांसह एक महिना झोपडी घालून मुक्कामाला विजय गडावर होतो.शासनाकडून जमीन घेऊन या स्मारकाची निर्मिती केली आहे.म्हणून आमच्या संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

हे स्मारक
भारतवर्षात एकमेव असे स्मारक ज्येष्ठ स्वतंत्रा सेनानी डाॅ. भाई केशवराव धोंडगे यांच्या संकल्पनेतून, तत्कालीन पंचायत समिती सभापती भाई गुरुनाथराव कुरुडे,उप सभापती शंकरराव पा.जाधव,भाई राजेश्ववरराव आंबटवाड आणि शे.का.पक्ष अनेक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या “जय बांगला”स्मारक विजय गड कंधार येथे अख्या भारतात एकमेव स्मारक निर्माण करुन इतिहास घडविला.कंधार-लोहा तालुक्यातील अनेक चळवळी,विविध स्मारके, अनेक गडांची निर्मिती करुन गनीमी काव्याने अनेक कार्य केले.गुराखी गडावर जागतिक गुराखी साहित्य संमेलन भरवून कंधारच्या मर्दुमकीची पताका फडकवली. व्आर्यक्रपहिल्या प्रथम गनीमी कावा करुन डाॅ. भाई केशवरावजी धोंडगे यांनी निर्माण केलेल्या जिजाऊंचे स्मारक निर्माण केले.या मातृस्मारकावर राष्ट्रमाता जिजाऊ यांचे स्मारकाची प्राणप्रतिष्ठा केली.माझ्या क्रांतिभुवन बहाद्दरपुरा नगरीतील एमेकर परिवाराच्या निवासस्थान गनीमी काव्याने जिजाऊ माॅ साहेबांचा अर्धपुतळा कलावंत दत्तात्रय एमेकर गुरुजी व अॅड प्रकाशजी डोम्पले यांच्या समर्थ हस्ते निर्माण करुन मातृतीर्थ विजय गडावर बसविले.डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे यांचेवर कार्यवाही झाली.पण..त्यानंतर मन्याड खोर्‍यातील ज्येष्ठ विधीज्ञ बालाजीराव पांचाळ साहेब यांनी डाॅ.भाई केशवराव धोंडगे या केस मधुन निर्दोष मुक्तता करुन ही केस जिंकून आपल्या बुध्दी कौशल्याची चुणुक दाखवली.दर वर्षी १६ डिसेेंबर व १२ जानेवारी रोजी श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीत कंधारच्या वतीने, डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या संयोजनातून श्री शिवाजी हायस्कूल कंधार शाळा दरवर्षी कार्यक्रम आयोजित केला जातो या कार्यक्रमात उपप्राचार्य प्रा.हिदायत बेग सर,प्रा.राठोड मॅडम, सुरेश ईरलवाड, शेख मैनुद्दीन, शेख ऐनोद्दीन, दत्तात्रय एमेकर, सौरव कदम, श्रीवास्तव, निखिल भांगे,मन्मथ पेठकर, राजू लूंगारे, चंद्रकांत मोरे,आदी देशभक्त उपस्थित होते.तरआभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख भास्करराव आकुलवाड सर यांनी केले तर उत्कृष्ट सुत्रसंचलन मुख्याध्यापक हरिभाऊ चिवडे यांनी केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *