कंधार ; प्रतिनिधी
महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत शंभर फुटाचा रस्ता झाला पाहिजे या मागणीमुळे आण्णाभाऊ साठे शॉपिंग सेंटर मधील दुकाने वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.हे शाॅपीग सेंटर पडले तर रस्ता शंभर फुटाचा होईल यासाठी माजी सैनिक संघटना प्रयत्न करत आहे तर सकल मातंग समाजा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दर्शनी भागात यावे यासाठी प्रयत्न करत आहे. शॉपिंग सेंटर वापरण्यासाठी व्यापारी ही सातत्याने प्रयत्न करत आहेत. हे शॉपिंग सेंटर पडेल की नाही हा येणारा काळच ठरवणार असला तरी सध्या व्यापारी चांगलेच संकटात सापडले आहेत .
या शॉपिंग सेंटरमधील व्यापाऱ्यांच्या डोक्यावर लिलावाची टांगती तलवार आहे.सन 2006 मध्येच या दुकांनाचा करार संपला आहे.दिनांक 15 नोव्हेंबर 2023 रोजी दुकाने खाली करण्यात यावे अशी नोटीस तहसीलदार तथा मुख्याधिकारी राम बोरगावकर यांनी दिली होती.यावर व्यापाऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती परंतु न्यायलयाने ही याचिका निकाली काढली असुन व्यापाऱ्यांची याचिका नामंजूर केली असल्याची माहिती माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांनी दिली आहे.या निकालाने येथील व्यापाऱ्यांची डोकेदुखी वाढली असून या दुकानाचा नव्याने लिलाव होणार हे मात्र स्पष्ट झाले आहे.
शहरातील महाराणा प्रताप चौकातील अण्णाभाऊ साठे शॉपिंग सेंटर चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.दुकांने वाचवण्यासाठी व्यापारी प्रयत्न करत आहेत.तर सकल मातंग समाज व माजी सैनिक संघटना हे शॉपिंग सेंटर पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे.या संदर्भात काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी यांची बैठक होऊन सदरील शॉपिंग सेंटर हे पाठीमागे घेण्याचा निर्णय झाल्याची चर्चा होती.या शापिग सेंटर मधील दुकानाचा करार सन 2006 मध्येच संपला आहे तत्कालीन मुख्यधिकारी यांनी मुदत वाढवून घेण्यासाठी ठराव घेऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता परंतु या मुदतवाढी संदर्भात कोणीच पाठपुरावा केला नसल्यामुळे हा ठराव मंजूर झाला नाही. तेव्हापासून आजपर्यंत येथील व्यापारी ही बेकायदेशीर नगर पालिकेकडे भाडे भरून दुकाने वापरत होते.
यासंदर्भात हे दुकाने खाली करण्यात यावे अशी मागणी माजी सैनिक संघटना व सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली होती या मागणीची दखल घेऊन तहसीलदार तथा मुख्याधिकारी राम बोरगावकर यांनी दिनांक 30-112023 रोजी दुकानदाराला सदरील दुकाने दिवाळीनंतर 15-11 2023 रोजी रिकामे करावे अशा पद्धतीच्या नोटीस देण्यात आल्या होत्या. व्यापाऱ्यांनी कंधार न्यायालयात याचिका दाखल करुन आव्हान दिले होते. यावर न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करून व्यापाऱ्यांची याचिका नामंजूर करण्यात आली आहे त्यामुळे या दुकानाचा लिलाव होणार की नगर पालिका या व्यापाऱ्यांना पाठीशी घालणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे
महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत शंभर फुटाचाच रस्ता व्हावा ही सर्वांची अपेक्षा आहे.जिल्हाधिकारी यांनी बैठक बोलवून यासंदर्भात तोडगा काढला आहे. शाॅपीग सेंटर हे पाठीमागे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.आम्ही व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही.शहराचा विकास झाला पाहिजे हिच आमची भूमिका आहे.सदरील शाॅपीग सेंटर हे पाठीमागे सरकुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाॅपीग सेंटर च्या धर्तीवर होणार आहे त्यामुळे या ठिकाणी अकरा दुकानाच्या ऐवजी 22दुकाने होणार आहेत.व्यापऱ्यांनी संयमाची भुमिका घेवून सदरील दुकाने खाली करावे.
बालाजी चुक्कलवाड माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष
न्यायालयाने व्यापाऱ्यांची याचिका नामंजूर केली आहे नगर पालिका प्रशासनाने आता कोणताच विलंब न करता सदरील दुकाने खाली करावे.जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे शाॅपीग सेंटर पाठीमागे बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात यावा अन्यथा दिनांक 20डिसेबंर रोजी पुन्हा उपोषणाला बसणार
मामा गायकवाड
मांतग समाज नेते