कंधार शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कंपाऊंडची उंची वाढविण्याची शिवसेना शिंदे गटाचे कंधार मागासवर्गीय तालुकाध्यक्ष पिंटु भगवानराव कदम यांची तहसिलदारांना निवेदनाद्वारे मागणी

कंधार ; प्रतिनिधी

कंधार शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कंपाऊंडची उंची वाढविण्याची शिवसेना शिंदे गटाचे पिंटु भगवानराव कदम, शिवसेना (शिंदे गट) मागासवर्गीय तालुका अध्यक्ष कंधार यांनी तहसिलदार यांचाकडे दि १८ डिसेंबर रोजी निवेदनाद्वारे  मागणी केली आहे .

 
कंधार येथे मध्यवर्ती ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असुन सध्या महाराणा प्रताप चौक ते शिवाजी चौक रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले असुन पुर्वी असलेले डॉ. बाबासाहेब आंडेकर पुतळयाचे कंपाऊंड हे रोड लगत आले आहे .

कंपाऊंडची उंची ही कमी असल्यामुळे रोडवरील कुत्रे व इतर जनावरे हे कंपाऊंड मध्ये येत आहे. त्यामुळे पुतळ्याची विटंबना होत आहे. सोबत पुतळ्यामध्ये जनावरे घुसल्याचे छायाचित्र सोबत जोडण्यात येत आहेत.

तात्काळ तहसिलदार यांनी   सदरील प्रकरणाची पाहणी करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या कंपाऊंडची उंची वाढवुन सहकार्य करावे अशी विनंती केली .

#———– video

कंधार: कंधार शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कंपाऊंडची उंची वाढविण्याची शिवसेना शिंदे गटाचे कंधार मागासवर्गीय तालुकाध्यक्ष पिंटु भगवानराव कदम यांची तहसिलदारांना निवेदनाद्वारे मागणी https://link.public.app/PFW14?utm_medium=android&utm_source=share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *