मुखेड (दादाराव आगलावे)
येथील जोशी इन्फोटेक या संगणक प्रशिक्षण केंद्राने क्लिक डिप्लोमा या प्रशिक्षण कार्यक्रमात उत्कृष्ट संगणक प्रशिक्षण केंद्र म्हणून पुरस्कार पटकाविला. हा पुरस्कार गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण, आणि विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिल्याबद्दल महाराष्ट्र ज्ञान महामंडळ पुणे या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विणा कामथ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला एम के सी एल चे सिनिअर जनरल मॅनेजर विकास देसाई, अतुल पाटोदी, अमित रानडे, विभागीय समन्वयक महेश पत्रिके, जिल्हा समन्वयक पंढरीनाथ आघाव यांची उपस्थिती होती. जोशी इन्फोटेक गेल्या 22 वर्षापासून मुखेड येथे यशस्वीरीत्या कार्यरत आहे, आणि आता पर्यंत तब्बल 18000 विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान देवून व्यवसाय आणि नोकरीसाठी स्वयंपूर्ण करण्यात मोलाचा वाटा उचलत आहे. मुखेडला इंटरनेटची ओळख करून देण्यापासून ते नव-नवीन संगणक प्रशिक्षण कार्यक्रम, कौशल्य विकास कार्यक्रम, मराठा समाजासाठी सारथी संस्थेअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम, असे अनेक उपक्रम या केंद्रामार्फत आजतागायत सुरू आहेत.
या यशाबद्दल मुखेडभूषण डॉ. दिलीप पुंडे, डॉ. अशोक कौरवार, डॉ. रामराव श्रीरामे महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद अडकीने, शाहीर अण्णा भाऊ साठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर तोटरे, संभाजी केंद्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहाने यांनी जोशी इन्फोटेक चे कौतुक केले.