स्वच्छता दुत,प्रबोधन कीर्तनकार राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या ६७ व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवंदन.

स्वच्छता दुत,प्रबोधन
आज २० डिसेंबर २०२३ रोजी श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीत कंधार या संस्थेतील मातृशाळा श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार या ज्ञानालयात १९ व २० डिसेंबर २०२३ रोजी शाळेच्या मैदानावर स्वच्छता अभियान वर्ग ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी राबवून राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या ६७ व्या स्मृतीस स्वच्छता करुन आभिवंदन केले.या प्रसंगी हायस्कूलचे मुख्याध्यापक सदाशिव आंबटवाड सर, उपमुख्याध्यापक अनिल जाधव सर पर्यवेक्षक रमाकांत बडे सर आणि आनंद भोसले सर,उपप्राचार्य प्रा.संभाजी वडजे सर यांनी छ.शिवाजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज, संस्थेचे दैवत मातोश्री मुक्ताई धोंडगे,विद्रोही विचारवंत, डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.दत्तात्रय एमेकर सरांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी संस्थापक व संचालक डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांना दिलेल्या भेटीचा संक्षिप्त इतिहास सांगत.भुतपुर्व घटनेला उजाळा देत तत्कालीन परिस्थितीचा विद्यार्थी व शिक्षक सहकार्यांना गतगोष्टीचा इतिहास सांगीतला.

 

डाॅ.भाई मुक्ताईसुतास ऐन उमेदीत राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी बोलावून आपल्या कीर्तनात भाषणाची संधी दिली होती.काकांडी ता.नांदेड येथील ल्हावं देवीच्या यात्रेत अनिष्ट रूढी परंपरा बंद करणेसाठी श्री संत गाडगे बाबांच्या समाज प्रबोधनपर किर्तन समयी राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक कार्याचीही ओढ केशवरावांना लागली नांदेड तालुक्यातील काकांडी या गावी ल्हावं’देवीची प्रसिध्द यात्रा भरत असे. पा यात्रेदरम्यान बारा ते पंधरा हजार बकऱ्यांची मुंडी एका घावात उडविण्याची परंपरा होती याची माहिती समाज सुधारक,राष्ट्रसंत श्री संत गाडगे महाराजांना मिळाली.

 

त्यामुळे त्यांनी त्याचे शिष्य तनपुरे महाराजांना काकांडी व परिसरातील गावांत जाऊन किर्तनातून समाज प्रबोधन करून ही प्रथा बंद करण्याचा सत्ता दिला. यात्रेच्या दिवशी स्वतः श्री संत गाडगे महाराज या यात्रेला उपस्थित राहीले या भागात आल्यानंतर भाई केशवराव धोंडगे साहेबांच्या शैक्षणिक राजकिय सामाजिक कार्याची माहिती श्री संत गाडगे बाबांना मिळाली. संत गाडगे बाबांनी बोलावल्यानुसार भाई धोंडगे साहेब व मातोश्री मुक्ताई आपल्या सहकाऱ्यासह या यात्रेसाठी उपस्थित होते. बकरे कापण्याच्या ठिकाणीच गाडगे बाबांनी किर्तनाला सुरवात करून किर्तनातून गाडगे बाबांनी या अनिष्ठ रूढी परंपरेला कडाडून विरोध केला आणि यानंतर इथे बकरे कापले जाणार नाहीत, कापायचे असेल तर मला अगोदर कापावे लागेल, नंतरच बकरे कापले जातील असा संकल्प केला.श्री संत गाडगे महाराज यांच्या कीर्तना समयी गाडगे महाराज यांनी मन्याड खोर्‍यातील बुलंद तोफ डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेबांना भाषण करावयास लावले.

 

केशवरावांनी आपल्या भाषणाने लाखों लोकांच्या मनावर गारुड घालतांना टाळ्यांचा कडकडाट मिळवताच संत गाडगे महाराज भारावून गेले.त्या समयी मातोश्री मुक्ताई समक्ष आशीर्वाद देतांना मुक्ताईस गाडगे महाराज म्हणाले “पुत्र व्हावा ऐसा गुंडा,त्याचा तिन्ही लोकी झेंडा”हे ऐकताच मुक्ताईच्या आनंदाला पारावार राहिला नाही.गाडगे महाराज यांनी जगाचा निरोप घेतला तेंव्हा मातोश्री व मुक्ताईसुतास व भाई गुरुनाथराव कुरुडे त्यांच्या सहकार्यांना अतिशय दु:ख झाले.त्यानंतर ११ जुन १९५७ रोजी लोहा नगरीतील १ ली ते पदवी व पदव्युत्तर ज्ञानालयास संत गाडगे महाराज यांचे नाव देऊन त्यांची चिरकाल स्मृती तेवत राहावी या साठी श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार संस्थेनी अनोखे अभिवादन केले.मुख्याध्यापक सदाशिव आंबटवाड सर यांनी आपल्या भाषणात स्वच्छतेचे महत्त्व सांगुन विद्यार्थ्यांनी दोन दिवस स्वच्छता अभियान राबविले त्या बद्दल सर्व गुरुजन व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सेवक मन्मथ पेठकर आणि सहावीचा विद्यार्थी गारोळे व वर्ग शिक्षिका चिंतेवार मॅडमचा सत्कार धोंडगे मॅडम यांच्या समर्थ हस्ते केला.सुत्रसंचलन कदम सर यांनी केले.कार्यक्रमाचे क्षणचित्र सांस्कृतिक विभाग प्रमुख आकुलवाड सर यांनी मोबाईल टिपली आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *