लालकंधारी संवर्धन केंद्राची कंधारलाच मंजुरी मिळाली पाहिजेत ;-आमदार श्यामसुंदर शिंदे
कंधार ( प्रतिनिधी )
सन 1988 साली लालकंधारी संवर्धन केंद्र कंधार तालुक्यातील गऊळ येथे मंजूर करण्यात आले होते पण हे लालकंधारी संवर्धन केंद्र बीड येथे हलवण्याचा निर्णय झाला असल्याने सन 2019 च्या पशुगणनेत लालकंधारी वळू व गाईंची संख्या बीड जिल्ह्यापेक्षा नांदेड जिल्ह्यात जास्त संख्या असून लोहा-कंधार मध्ये लाल कंधारी 1 लक्ष 15 हजार तर ब्रिड ची संख्या 80 हजार आहे तर बीड जिल्ह्यामध्ये लाल कंधारीची संख्या 32 हजार तर 18 हजार ब्रिड ची संख्या आहे.
बीड जिल्ह्यापेक्षा जास्त लाल कंधारी ची संख्या लोहा कंधार मतदारसंघात असून लालकंधारी ची अल्पसंख्या असलेल्या बीड लालकंधारी संवर्धन केंद्र का हलवण्यात येते? असा प्रश्न लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला, कोणत्याही परिस्थितीत कंधार येथील लाल कंधारी संवर्धन केंद्र बीड येथे हलवून माझ्या मतदारसंघावर अन्याय करू नका असा प्रश्न आमदार शिंदे यांनी सभागृहात मांडला व बीड येथे गरजच असल्यास नवीन लाल कंधारी संवर्धन केंद्र द्या असेही सभागृह बोलताना आमदार शिंदे यांनी सांगितले,
मतदारसंघातील लालकंधारी वळू व गाईंना देशभर प्रसिद्धी व अत्यंत महत्त्व असल्याने या भागाचे तत्कालीन दिवंगत आमदार व खासदार भाई केशवराव धोंडगे यांनी मतदारसंघातील लालकंधारी जात जपण्यासाठी व त्यांना वैभव मिळून देण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली असल्याचेही आमदार शिंदे यांनी सभागृहात सांगितले. कोणत्याही परिस्थितीत कंधार येथील लालकंधारी संवर्धन केंद्र बीडला जाऊ देणार नसल्याची प्रतिक्रिया आमदार शिंदे यांनी नंतर माध्यमांशी बोलताना दिली, आमदार शिंदे यांनी लालकंधारी संवर्धन केंद्राचा महत्त्वाचा विषय अधिवेशनात उपस्थित केल्यामुळे मतदारसंघातील पशुपालकातून आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.