नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस तथा झुंजार पत्रकार राम तरटे यांचे कनिष्ठ बंधू माधव गंगाराम तरटे यांचे आज दिनांक 21 डिसेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजता मुंबई येथे निधन झाले.
मृत्यू समयी ते 35 वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, भाऊ, भाऊजयी असा मोठा परिवार आहे.
माधव तरटे यांच्या डोक्यात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबई येथील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपचार सुरू असतानाच आज पहाटे साडेतीन वाजता त्यांचे निधन झाले.
त्यांचा पार्थिव देह नांदेड कडे आणण्यात येत असून आज रात्री आठ वाजता बिलोली तालुक्यातील केरूर (देगलूर रोडवरील) या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कालकथित माधव तरटे यांना मराठी पत्रकार परिषद मुंबई, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ व महानगर पत्रकार संघाच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली.