दिपगंगा भागीरथी राज्यस्तरीय पुरस्कार २०२३ साठी बरबड्या चे भूमिपुत्र नागोराव मारोती तिप्पलवाड यांची निवड 

 

महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक, समाजसेवक तथा दिपगंगा भागीरथी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष मा. श्री. दिपक लोंढे यांनी “दिपगंगा भागीरथी राज्यस्तरीय पुरस्कार” निशुल्क देय पुरस्कार असलेल्या या अत्युच्च मानाच्या अलौकिक पुरस्कारसाठी १४ विविध क्षेत्रांतून प्रस्ताव पाठविण्याचे बातमी पत्रक द्वारे जाहीर आवाहन केले होते. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पुरस्कार मागणीसाठी १४ विविध क्षेत्रांतून एकूण २४२१ व्यक्तीचे प्रस्ताव आले होते.

१४ विभागांतून निवड समितीने अत्यंत पारदर्शक गुणवत्तापूर्ण पद्धतीने 46 पुरस्कारार्थी यांची निवड केली त्यात बरबड्या चे भूमिपुत्र नागोराव मारोती तिप्पलवाड उर्फ एन टी गुरुजी बरबडेकर यांची निवड जाहीर झाली आहे त्यानी आजपर्यंत केलेल्या शैक्षणिक,सामाजिक,धार्मिक व रक्तदानासारख्या पवित्र कार्यात स्वतःला झोकून दिलं त्याची ही पावती आहे त्यांचा रविवार दि.७ जानेवारी २०२४ रोजी मिरज, जि. सांगली येथे नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर दिपगंगा भागीरथी राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा विशेष अतिथी च्या हस्ते संपन्न होणार आहे

 

त्यांच्या या निवडबद्दल शाळेचे मुख्याध्यापक तथा अध्यक्ष दिलिपरावजी धर्माधिकारी, उपाध्यक्ष सदाशिवरावजी धर्माधिकारी, संचालक व्हीं टी सूरेवाड सर, इरना कंडापल्ले, शिवाजीराव धर्माधिकारी, प्रा सुदर्शन धर्माधिकारी,सरपंच माधवराव कोलगाने,उपसरपंच सौ छायाताई धर्माधिकारी, माजी सरपंच बालाजीराव मदेवाड, भास्करराव धर्माधिकारी,बालाजीराव धर्माधिकारी,शिवाजीराव मोहनराव धर्माधिकारी, विश्वनाथ बडूरे, गावातील सर्व पालक,आजी माजी विद्यार्थी व शाळेचे उपमुख्याध्यापक बडूरे सर, शिंदे सर, फड सर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *