कंधार ;( दिगांबर वाघमारे )
कंधार शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक ते जाधव हॉस्पिटल हा रस्ता १०० फुटाचा करण्यात यावा यासाठी माजी सैनिक संघटना व सकल मातंग समाजाच्या वतीने आंदोलने करण्यात आले.याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधित सर्व विभागांची दि.५ डिसेंबर रोजी बैठक घेतली.या बैठकीचा इतिवृत्तांत तहसीलदार तथा मुख्याधिकारी कंधार यांना देण्यात आला असून यामध्ये मंजूर असलेला १८ मीटरच्या रस्त्याचे काम सुरू करावे.व तोच रस्ता १०० फुटाचा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव सादर करुन मंजूरी घ्यावे असे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले.
यामुळे येथील शॉपिंग सेंटर पाडून त्याची पुनर्रचना करण्याचे आदेश दिल्याने अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दर्शनीय भागात येणार असल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये जिल्हाधिकारी यांचे आभार मानले जात आहे.
बैठकीच्या सुरूवातीस तहसिलदार कंधार तथा मुख्याधिकारी नगरपरिषद कंधार यांनी कंधार शहरातील महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत जाणारा रस्त्याचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत असून सदरचा रस्ता हा १८ मीटर रूंदीचा करण्यात येत असल्याचे सांगितले. तथापि निवेदनकर्ते व तेथील काही स्थानिक लोकांच्या मागणीप्रमाणे सदर रस्ता राज्य महामार्ग असल्यामुळे राज्य रस्त्याचे नियमावलीनुसार सदर रस्त्याची रुंदी १०० फूट करून त्यानुसार बांधकाम करणेची गरज असल्याचे सांगितले. त्यासाठी नगरपरिषद कंधारच्या मालकीचे असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शॉपीग कॉम्पलेक्स पाडावे लागेल. ज्यामुळे सदर रस्त्याच्या पाठीमागे असणारा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दर्शनी भागात येईल असेही सांगितले.त्यानंतर सहा.
अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कंधार यांनी असे सांगितले की, सदरचा रस्त्याचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुर असून सदर रस्ता १८.०० मीटर रुंदीचा मंजुर आहे. सहाय्यक संचालक, नगर रचना नांदेड यांनी सदर रस्ता कंधार नगरपरिषदेच्या डि.पी. प्लॉन मध्ये Existing road (अस्तित्वातील रस्ता) असून कंधार नगरपरिषदेच्या मंजुर विकास आराखड्यानुसार सदर रस्ता १८.०० मीटर रुंदीचा आहे असे सांगितले. त्यानंतर उप अधीक्षक, भूमी अभिलेख कंधार यांनी सदर रस्त्याबाबत भूसंपादन व मोजणीची जूनी अभिलेखाचा कार्यालयात शोध घेतला असता याबाबत पुरावे सापडले नसल्याचे सांगितले.
यावर मा. जिल्हाधिकारी यांनी नगरपरिषद कंधार यांनी ठराव घेवून सदर रस्त्यालगत असलेले नगरपरिषदेच्या मालकीचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शॉपीग कॉम्पलेक्सची पूर्नरचना करणेबाबत मंजुरी मिळणेचा प्रस्ताव शासनास सादर करावा. सदर शॉपीग कॉम्पलेक्समधील गाळयांच्या भाडेसंदर्भातील करारानाम्यानुसार गाळेधारकांची मुदत संपल्यामुळे गाळे रिकामे करण्यासाठी मुख्याधिकारी यांनी दिलेल्या नोटीसीच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही पूर्ण करावी. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची दक्षता मुख्याधिकारी नगरपरिषद व तहसिलदार, कंधार यांनी घ्यावी. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुर असलेला १८.०० मीटर रुंद रस्ता करण्याचे काम सुरु ठेवावे व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सदर रस्ता राज्य महामार्गाच्या नियमानुसार १०० फुट करण्याच्या अनुषंगाने वाढीव रुंदीचा प्रस्ताव तयार करुन सदर प्रस्तावास त्यांच्या विभागाची मंजुरी घ्यावी असे निर्देश दिले.
शहरातील हा रस्ता १०० फुटाचा झाल्यास येथील रहदारीचा प्रश्न मिटणार असून भविष्यात अपघात होणार नाहीत.परंतू येथील तहसीलदार तथा मुख्याधिकारी यावर किती लवकर कारवाई करतात.हे महत्वाचे राहणार आहे.तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हाधिकारी यांच्या आदेशावर कशी कारवाई करतील हेसुध
आहे.का हा रस्ता लहान करुन येथील राजकारणी बघ्याची भुमिका घेणार का? असे अनेक प्रश्न जनतेमधून उपस्थित केले जात आहेत.