पेठवडज येथील गावात श्री.नारायण गायकवाड ग्रा.पं सदस्य पेठवडज यांचा संपूर्ण गावात बंदिस्त (कॅप) नाली करण्याचा निर्धार..

 

कंधार ;  पेठवडज तालुका कंधार येथील गावात संपूर्ण गावांमध्ये नाली व गटारे बांधकाम करून नालीवर व गटारे वर कॅप बसविण्याचा निर्धार व निर्णय मा.श्री.नारायण काळबा गायकवाड ग्रा.पं.सदस्य पेठवडज व तसेच मा.श्री.दत्ता पोचिराम गायकवाड (सरपंच प्रतिनिधी) यांनी घेतला

 

असून गावाची लोकसंख्या लक्षात घेता विकासाच्या दृष्टिकोनातून आजपर्यंत झालेली कामे व प्रगतीपथावर असलेली कामे लक्षात घेता गावातील जनतेची व नागरिकांची व महिलांची व लहान मुले व मुली व सर्व गावातील कुटुंबांचे आरोग्य धोक्यात येऊ नये व डासापासून मुक्तता व्हावी किंवा आरोग्यास त्रास होऊ नये त्यामुळे इत्यादी रोगापासून जसे की हत्तीपाय, मलेरिया, डेंगू,रोगापासून मुक्तता व्हावी व कुठलाही जनतेला साथ रोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून असा हा महत्त्वाचा निर्णय श्री. नारायण कळबा गायकवाड यांनी व दत्ता पोचिराम गायकवाड यांनी घेतला व यासाठी संपूर्ण गाव शिवार फेरी करून पाहणी करण्यात आली 

 

सर्वे करण्याचा निर्णय घेतला असून यावेळी महेंद्र देशपांडे साहेब (तांत्रिक सल्लागार नांदेड) व तसेच श्री.संतोष नायर (जुनिअर इंजिनियर नांदेड) व श्री. मारोती एकनाथ गायकवाड यांनी संपूर्ण गावात गाव शिवार फेरी करून पाहणी केली व या शिवार फेरीला श्री. शिवाजी लक्ष्मण करेवाड व मा.श्री चंद्रकांत रावजी देशमुख साहेब व तसेच व्यंकट जयराम कारभारी व तसेच ग्रामपंचायत पेटवडजचे रोजगार सेवक

 

श्री. बालाजीराव शिवाजीराव तेलंग व तसेच राजेश दत्ता पंदीलवाड (संगणक परिचालक) व श्री.जगन्नाथ करेवाड व तसेच ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी व गावातील नागरिक व तसेच कैलास गंगाधर शेटवाड (माजी सरपंच पेठवडज) हे सर्व गाव शिवार फेरीस उपस्थित होते तसेच शिवार फेरी झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज सभागृहात सविस्तर सर्व चर्चा करण्यात आली व मा.श्री.महेंद्र देशपांडे साहेब व त्यांच्या टीमचा सत्कार करण्यात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *