शालेय जीवनात बरेच जणांना कठीण वाटणारा विषय म्हणजे गणित, गणिताची चाचणी म्हटलं कि तेव्हा प्रत्येकाच्या अंगावर शहारे यायचे, पण तेच शालेय जीवनात कधी पदवीच्या मुलांना शिकवले का?
नाही ना! पण आपल्याच देशाच्या एका महान व्यक्तिमत्वाने शाळेत असताना पदवीच्या मुलांना गणित शिकवले, ते व्यक्तिमत्व म्हणजे श्रीनिवास रामानुजन. आजच्या लेखात आपण त्याच महान व्यक्तिमत्वा विषयी माहिती पाहणार आहोत, तर चला पाहूया.
श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ ला एका ब्राम्हण परिवारात झाला. त्यांचा परिवार भारताच्या तामिळनाडू च्या कोइम्बतुर मधील इरोड गावात झाला. त्यांचे वडील श्रीनिवास अय्यंगर हे साड्यांच्या दुकानात मुनीम म्हणून काम पाहत असत.
त्यांची आई कोमल तम्मल ह्या एक गृहिणी असतानाच सोबत एका स्थानिक मंदिरात गयिका सुद्धा होत्या. आणि ज्याप्रमाणे प्रत्येक मुलाला आपल्या आईची जवळीक असते तसे त्यांनाही त्यांच्या आईच्या जवळ राहायला जास्त आवडायचे. सुरुवातीला रामानुजन कुम्भकोणम या गावी आपल्या परीवारासोबत राहायचे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण हे कुम्भकोणम या गावामध्येच झाले, आणि त्यांना सुरुवाती पासून गणिताची आवड असल्याने बाकी इतर विषयांमध्ये रुची निर्माण झालीच नाही, ते शाळेत असताना त्यांच्या घरी काही पदवीचे मुले भाडेकरू म्हणून राहत असत. आणि रामानुजन गणितात एवढे तरबेज होते कि ते सातवीत असतानाच पदवीच्या त्या मुलांना गणित शिकवत असत. यावरून आपण समजू शकतो कि रामानुजन नावाच्या या गणितज्ञा मध्ये किती मोठी प्रतिभा लपलेली होती.
रामानुजन यांना गणित आणि इंग्रजी या दोन विषयांची विशेष आवड होती, सुरुवातीला त्यांना त्यांच्या अलौकिक प्रतिभेमुळे शिष्यवृत्ती मिळाली, रामानुजन गणितामध्ये एवढे मग्न झाले होते कि त्यांनी इतर विषयांकडे लक्षच दिले नाही, रामानुजन यामुळे १२ वी मध्ये नापास झाले. आणि त्यांना मिळणारी शिष्यवृत्ती सुद्धा बंद झाली.
त्यानंतर त्यांच्या शिक्षणाचे दरवाजे बंद झाले, आता ते बेरोजगार झाले होते कारण त्यांच्याकडे आता कोणतेही काम नव्हते, आणि हा काळ त्यांच्या साठी खूप कठीण काळ होता या कठीण काळात त्यांच्याकडे त्यांच्या गणिता शिवाय कोणतीही गोष्ट नव्हती, त्यांना या कठीण काळात खूप काही सहन करावे लागले, जसे लोकांजवळ त्यांना पैशांची भिक सुद्धा मागावी लागली, रस्त्यावरचे कागद सुद्धा उचलून आपला उदरनिर्वाह करावा लागला. त्यांनतर त्यांची तब्येत सुद्धा घसरली.
याच दरम्यान १९०८ मध्ये त्यांच्या आईने त्यांचे लग्न जानकी नावाच्या एका मुलीशी लावले त्यानंतर त्यांच्यावर आणखी एक जबाबदारी येऊन पडली होती, आता त्यांना काम शोधणे अनिवार्य झाले होते, तेव्हा त्यांनी मद्रास मध्ये जाऊन पुन्हा नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न केले, ते कोणाकडे सुद्धा जायचे तेव्हा त्यांनी सोडविलेले गणिते ते लोकांना दाखवत असत, पण कोणीही त्या गणितांना न समजता त्यांना नकारात असे, पण खूप दिवसांच्या मेहनतीनंतर एक दिवस त्यांची भेट तेथील डिप्टी कलेक्टर श्री व्ही. रामास्वामी अय्यर यांच्याशी झाली, ते गणितामध्ये पारंगत होते,जेव्हा त्यांनी रामानुजन यांनी सोडविलेली गणिते पाहिली तेव्हा त्यांनी ओळखले कि हि व्यक्ती एक प्रतिभावान व्यक्ती आहे, आणि त्यांनी रामानुजन यांना कामावर ठेवून घेतले २५ रुपये महिन्याच्या पगाराने. येथून रामानुजन यांचे संपूर्ण आयुष्याला एक वेगळं वळण मिळाल, त्यानंतर त्यांनी या मासिक वेतनामधून पुन्हा आपल्या शिक्षणाची वाटचाल सुरु केली.
एक वर्ष मद्रास मध्ये राहून त्यांनी स्वतःचे एक शोध पत्र प्रकाशित केले, त्या प्रकाशित केलेल्या शोधपत्रकाचे नाव होते, “जर्नल ऑफ इंडियन मॅथेमेटिकल सोसाइटी असे होते.”या शोधपत्रकामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली, आणि १९१२ मध्ये त्यांना रामचंद्र राव यांच्या ओळखीमुळे त्यांना मद्रास पोर्ट ट्रस्ट मध्ये एक क्लर्क ची नोकरी मिळाली. तेच काही दिवसांनतर सुत्र प्राध्यापक सेशू अय्यर यांनी रामानुजन यांना केंब्रिज येथील प्रसिद्ध गणिताचे प्राध्यापक जीएच हार्डी यांना पत्र पाठविण्याचे सुचवले.
त्यानंतर रामानुजन यांनी त्यांचे सर्व प्रमेय एका पत्रात लिहून त्यांना पाठविले, आणि जीएच हार्डी यांना ते एवढे आवडले कि त्यांनी रामानुजन यांना लगेच त्यांच्याकडे बोलावून घेतले. तेथे गेल्यावर जीएच हार्डी यांनी त्यांच्या शिक्षणचा खर्च उचलला.
रामानुजन यांना इंग्लंड मधील हवामान भावले नाही आणि त्यांची तब्येतीमध्ये बिघाड झाली, आणि विशेष म्हणजे तेव्हा इंग्लंड पहिल्या महायुद्धामध्ये सहभागी असल्यामुळे इंग्लंड ला अन्नाचा तुटवडा पडला होता, आणि रामानुजन हे ब्राम्हण परिवाराचे असल्यामुळे ते शाकाहारी होते, आणि तेथे शाकाहारी अन्नाचा तुटवडा असल्यामुळे त्यांची तब्येत आणखी खालावली, ते याच दरम्यान भारतामध्ये परत आले. रामानुजन शेवटच्या दिवसांमध्ये अंथरुणावरच पडलेले होते, खूप उपचारानंतर सुद्धा त्यांच्यात काही बदल दिसून आला नाही, त्यानंतर २६ एप्रिल १९२० ला रामानुजन यांचे निधन झाले.
त्यांनी अंथरुणावर असताना ६०० परिणाम लिहिले होते, हे परिणाम सुरुवातिला मद्रासच्या विश्व विद्यालयात होते, त्यानंतर ट्रिनिटी कॉलेज च्या ग्रंथालयात यांना जमा केले गेले. याआधीही रामानुजन यांनी ३५०० पेक्षाही जास्त गणिताची प्रमेय लिहिलेली होती. आणि त्यांना टाटा इंस्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांनी प्रकाशित केले.
त्यावर २० वर्षापर्यंत इलिनॉय विद्यापीठाचे गणितज्ञ ब्रूस सी ब्रेंड्ट यांनी रिसर्च करून एक पुस्तक प्रकाशित केले आणि हे पुस्तक त्यांनी पाच वेगवेगळ्या खंडांमध्ये प्रकाशित केले आहे.
अश्या महान व्यक्तीच्या जीवनावर एक चित्रपट सुद्धा निघालेला आहे, त्या चित्रपटाचे नाव “The Man Who Knew Infinity”असे आहे.
तर अश्या महान व्यक्तीला माझा मनाचा मुजरा.
रूचिरा बेटकर,नांदेड.
9970774211